वर्ध्यात समर्थ बहुउद्देशीय संस्थेचा रंगीबेरंगी मल्हार गरबा नाईट कार्यक्रम* (वर्धा प्रतिनिधी.विपुल पाटील.)समर्थ बहुउद्देशीय संस्था, वर्धा यांच्या वतीने मल्हार गरबा नाईट या रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, बंजारी चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अश्विनीताई काकडे (अध्यक्षा, मनस्विनी मंच वर्धा ) यांना भूषविले.मुख्य अतिथी म्हणून मा. शुभांगीताई ठमेकर( जिल्हा प्रमुख वर्धा जिल्हा) मा. डॉ. स्मिताताई पावडे ( समाजसेविका) , मा. दुर्गाताई तिवारी (समाजसेविका), अँड. योजनाताई ढोक , मा. वर्षाताई बोकडे (समाजसेविका), मा. मेघाताई सुपारे (डायरेक्ट ऑफ स्वारी झुंबा डान्स अँड म्युझिक स्टुडिओ, वर्धा), मा. नीलिमाताई इटनकर (मेकअप आर्टिस्ट, वर्धा), मा. नीताताई साळवे, जयश्रीताई कोटगिरवार, शिल्पाताई दौड संगीताताई बेले, नलिनीताई पहाडे, शुभांगी ताई दौड,भाविनी सोनवणे , वैशालीताई बाहे, आशा झाडे, अरुणाताई पारवे, सौ. सुवर्णाताई उमाते तसेच भाग्यश्री घायवट, संध्याताई पूनसे , हेमलता खुजे, रिनाताई पातोंड, सुषमाताई ढगे, संध्याताई गावंडे, प्राची नगराळे (कोरोग्राफर), मनिषा करंडे (कोरोग्राफर), शुभांगी भो क भोकते, प्रेमलता ताई बुरंगे, सुविधाताई पंडिले, मानसी पंडिले आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी गरबा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नवरात्रोत्सवाचे सांस्कृतिक दर्शन घडविले. तालबद्ध पावले, रंगीबेरंगी पोशाख आणि भक्तीभाव यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली —🏆 प्रथम पारितोषिक: ₹5100/-🥈 द्वितीय पारितोषिक: ₹3100/-🥉 तृतीय पारितोषिक: ₹2100/-कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन समर्थ बहुउद्देशीय संस्था व वैष्णवी फॅशन अँड डिझायनिंग क्लास यांच्या पदाधिकारीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विविध मान्यवर, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले.नवरात्रीच्या शुभ प्रसंगी पारंपरिक गरबा संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी व समाजातील एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आयोजित हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.

वर्ध्यात समर्थ बहुउद्देशीय संस्थेचा रंगीबेरंगी मल्हार गरबा नाईट कार्यक्रम*                                                                           
Previous Post Next Post