गोदाकाठला भरीव निधी मंजूर करावा युवा शेतकरी संघर्ष समिती.. सुदर्शन राऊत ... (घनसावंगी प्रतिनिधी )अतिवृष्टीच्या भागात प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालेला आहे सरकारचं धोरण म्हणजे सरसगट मदत जाहीर करायची परंतु जे नुकसान झाले आहे त्याबदल्यात तुटपुंजी मदत जाहीर करायची नागरिकांचे बेहाल झाले होते गोदाकाठच्या गावातील नागरिकांचे गुरे ढोरे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले असून शेती खरडून गेली आहे शेतात पिके राहिलेच नाहीत पचनामे करायला राहीले काय आहे गोदाकाठच्या गावांचे पुनर्वसन होणे काळाची गरज आहे, गोदाकाठ परिसरात ऊस मोसंबी कापूस सोयाबीन तूर सर्व पिके वाहून गेले आहेत , मोटर पाईपलाईन सोलार घरावरील पत्रे झाडे खरडुन गेले आहेत शेतीचा प्रचंड नुकसान झाले आहे सरकार मायबापने गोदाकाठच्या भागातील गावांना विशेष पॅकेज जाहीर करून मदत जाहीर करावी अशी मागणी धडाडीचे युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी सुदर्शन राऊत गोदाकाठचे बुलंद तोफ सुदर्शन राऊत यांनी केले आहे काही सामाजिक संस्था गोदाकाठच्या भागातील नागरिकांना दिवाळी गोड होण्यासाठी किराणा किट वाटप करत आहेत आनंदाची गोष्ट आहे मात्र प्रशासनाने ही वेळीच मदत जाहीर करावी अतिवृष्टी भागात येऊन शेतकऱ्यांना मदत करावी ,सुदर्शन राऊत युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी यांनी बोलताना सांगितले
byMEDIA POLICE TIME
-
0