हिमालय विश्व महिला मंडळाने देवी जागर कार्यक्रम उत्साहात साजरा केला* (वर्धा ग्रामीण प्रतिनिधी विपुल पाटील.)वर्धा मधील उच्चभ्रू सोसायटी हिमालय विश्व येथे देवीचा जागर कार्यक्रम हिमालय विश्व महिला मंडळाकडून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. देवीचे एकूण 52 शक्तिपीठांपैकी आपल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ चे उत्कृष्ट सादरीकरण अतिशय सुंदर प्रकारे दर्शविण्यात आले या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा डॉ.ज्ञानदा फणसे मॅडम (Dy. CEO) व वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर पल्लवी बोधिले व सुरज बोधिले यांची उपस्थिती लाभली. अशा या अतिशय सुंदर कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण वर्धेत होत आहे हिमालय विश्व मधील महिला नेहमीच दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करतात या कार्यक्रमासाठी रोहिणी काशीकर, सुजाता जोशी आणि रूपाली फाले यांनी अथक परिश्रम घेतले.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिमालय विश्व महिला मंडळाच्या अध्यक्षा, उमा माहेश्वरी, मीरा उमरे, वर्षा सोरते तसेच हिमालय विश्व महिला मंडळ ह्यांचे सहकार्य लाभले..

हिमालय विश्व महिला मंडळाने देवी जागर कार्यक्रम उत्साहात साजरा केला*                                                                     
Previous Post Next Post