*विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आविष्कार उपक्रम**@)> श्री. नारायण चौधरी*{ अविष्कार संशोधन महोत्सवाचे उद्घाटन. (मानवत / बातमीदार.)————————————विद्यार्थी संशोधकांच्या नाविन्य पूर्ण कल्पना, शोध आणि प्रकल्पांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आविष्कार उपक्रम राबवला जातो. या महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या बहु आयामी विकासासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यांना आपल्या कल्पना सादर करण्याची संधी मिळते. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नारायण चौधरी यांनी येथे केले. येथील के. के. एम महाविद्यालयात बुधवार, दि. 8 रोजी आयोजित अविष्कार संशोधन महोत्सवच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, सहसचिव विजयकुमार दलाल, अविष्कार समन्वयक डॉ.काशिनाथ बोगले डॉ. ए बी. चिंदूरवार, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे, समन्वयक डॉ. एस. के. शिंदे, प्रा. कुकडे सुनीता डॉ. योगेश बागुल,डॉ. सत्यनारायण राठी, डॉ. सावंत एस.जी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना नारायण चौधरी यांनी सांगितले की, संस्था चालक आणि प्राचार्य एकाच रथाचे दोन चाके असतात. महाविद्यालयाच्या विकासात या दोघांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळेच महाविद्यालय नवनवीन उपक्रम घेऊन विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याची संधी उपलब्ध करून देतात. त्याचाच भाग म्हणून आज महाविद्यालयात अविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.विजयकुमार कत्रुवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. एस के शिंदे यांनी तर आभार डॉ. एस.आर. राठी यांनी मानले. या महोत्सवास परभणी जिल्ह्याच्या महाविद्यालयातील एकूण 58 विद्यार्थी संघांनी सहभाग नोंदवला.***
byMEDIA POLICE TIME
-
0