*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सेलू तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला.*. (सेलू तालुका प्रतिनिधी: - अतुल काकडे )सेलू:-तहसील कार्यालय सेलू ते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तालुकाप्रमुख श्री.अमर गुंधी यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला. यावेळी श्री .रवींद्र चव्हाण, तालुका समन्वयक श्री.योगेश इखार , उप तालुका प्रमुख श्री.अतुल काकडे, सेलू शहर प्रमुख श्री.पिंटू पराते, कार्यालय प्रमुख श्री.बालू भुरे, नरेश वरटकर, अजय कोल्हे ,विकास तावडे, प्यारेलाल जगताप, गोलू हिंगे, नितीन अग्निहोत्री, नामदेव वाघमारे, प्रमोद माहुरे, प्रीतम वाघाडे, गणेश मडावी इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी विद्यमान व पूर्वीच्या सरकारने शेतक-यांना सरसकट कर्ज मुक्तीचे आश्वासन दिले होते पण जवळपास एक वर्ष उलटुनही याविषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गीक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ महागडी खते, औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पीकांचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असून उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे. शेतकरी व ग्रामीण भागाने उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव, योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत, अनेकांना थकबाकीमुळे नोटीसा, जप्ती कार्यवाही, काहीकडून तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहे. दिवसेंदिवस त्याचे आकडे चाढत आहे.या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे. ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर, यामध्ये थकबाकीदार, चालू बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीक कर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलीहाऊस, बुध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ट करण्यात यावी.प्रमुख मागणी1. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये 50 हजार इतकी आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी.2. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्त ,७/१२ कोरा करा.3. पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.4. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्त्वरित देण्यात यावा.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सेलू तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला.*.                                                        
Previous Post Next Post