हिंगणघाट :शहरातील नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निशानपुरा वॉर्डचा पारंपरिक तटबंदीचा किल्ला आता हादरला आहे. पत्रकारितेत दबंग शैली दाखवणारे तरुण मोहसिन खान आता राजकारणाच्या रिंगणात उतरल्याने सत्ताधाऱ्यांच्या कपाळावर आठ्‌या पडल्या आहेत. गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि गैरकारभारावर निर्भीडपणे लिखाण करणारे मोहसिन खान लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातून थेट जनतेच्या सेवेच्या मैदानात उतरले आहेत. मोहसिन खानचा फोन गेल्यावर प्रशासनाला झोप उडते आणि काम होते, अशी चर्चा निशानपुरा गल्लीबोळांत रंगली आहे.मागील नगरसेवकांनी वॉर्डकडे केवळ दुर्लक्ष केले. फुटके रस्ते, विस्कळीत पाणीपुरवठा आणि रोजगाराचा अभाव या सगळ्याचा त्रास नागरिकांनासहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर खान हे प्रभागातील युवकांचे नवीन आशास्थान ठरत आहेत. ५००० मतदारांपैकी तब्बल ६० टक्के तरुण मतदार त्या-'च्याबरोबर असल्याची चर्चा जोरात आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनाला अनेकदा धडा शिकवलेल्या खान यांनी आता लढा जनतेसाठी, नाही तर कोणासाठी ? या घोषणेसह निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. निशानपुरा वॉर्डमधील लढत चुरशीची होणार हे निश्चित, पण जनता मात्र म्हणते, या वेळी काम करणाऱ्यांनाच संधी, आणि काम करणारा म्हणजे मोहसिन खान !

हिंगणघाट :शहरातील नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निशानपुरा वॉर्डचा पारंपरिक तटबंदीचा किल्ला आता हादरला आहे. पत्रकारितेत दबंग शैली दाखवणारे तरुण मोहसिन खान 
Previous Post Next Post