यंदाच्या दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट (वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुल कदीर ) हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यात यंदा सुरवाती पासूनच पावसाने शेतक-यांचे कंबरडे मोडले असून शेतक-यांच्या हातात दमडीही नसल्याने यंदाची दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न शेतक-यांना सतावत आहे दिवाळी सण अवघ्या दोन दिवसा वर येऊन ठेपला असतांना मात्र ग्रामीण भागातील बाजारात शुकशुकाट दिसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दरवर्षी दिवाळी पुर्वी शेतक-यांच्या घरात कापूस सोयाबिन पिके यायचे मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे कापसाला चार पाच बोंडे लागले असून अद्यापही शेतकरी शेतात सितादही सुध्दा केली नसल्याचे वास्तव चित्र दिसत आहे अतिवृष्टीमुळे दिपावली सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे शेतातील कोणतेही पिके शेतक-यांच्या हातात आले नसल्याने यामुळे ऐन दिवाळीत शेतकरी कोंडीत सापडले आहे शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळी पुर्वी शेतक-यांच्या खात्यात जमा केल्यास तेवढीच मदत होईल कसेतरी दिवाळी सण साजरा करू अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0