शेतकर्‍यांची दिवाळी गोड करा..पाचोर्यात महाविकास आघाडीचे आंदोलनसरकार विरोधात घोषणांनी जारगांव चौफुली दणाणले.. ( पाचोरा (प्रतिनिधी) - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तालुक्यात मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिवाळी पुर्व अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडी ने जारगांव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन केले. पाचोरा तालुक्यात मागिल काही दिवसांत अचानक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान काही प्रमाणात जाहीर केले आहे. जे अनुदान जाहीर केले ते दिवाळी च्या आधी त्यांच्या खात्यात जमा करा जेणेकरून त्यांची दिवाळी गोड जाईल. अशा मागण्या सह कॉग्रेस, शिवसेना उबाठा सह राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी ने आज दि १६६ रोजी शहरातील जारगांव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड अविनाश भालेराव, शिवसेना उबाठा चे उपनेते गुलाबराव वाघ, माजी सभापती उध्दव मराठे, रमेश बाफना, राष्ट्रवादी काँग्रेस नितीन तावडे, अझर खान या सह पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी कपाशी साठी सीसीआय सुरू करा,ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांना ना. गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले एक लाख त्वरीत द्या,सोयाबीन व ज्वारी ची शासकीय खरेदी त्वरीत सुरू करा, शेतकरी अनुदान घोटाळा ची चौकशी त्वरीत करुन ज्यांच्या अनुदान काढले गेले त्यांना त्वरीत पैसे द्या, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, खरडुन गेलेल्या जमीनीचे हेक्टरी पाच लाख त्वरीत रोखस्वरुपात द्या, विहीरीत गाळ काढण्यासाठी त्वरीत दोन लाख द्या, दुधाळ जनावरे यांच्यासाठी एक लाख द्या, शहरातील पंचनामे केलेली नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कुमावत यांना देण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे... शिवसेनेचे उपनेते रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश बाफना, माजी उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी शेख इस्माईल शेख फकीरा , इरफान मणियार, झानेश्वर पाटील, श्रावण गायकवाड, प्रकाश निकम, संदीप पाटील, चेतन बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी नितीन तावडे, शहराध्यक्ष अजहर खान,युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत पाटील, शिवसेना शहर प्रमुख अनिल सावंत, विनोद बाविस्कर माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र पाटील, माजी उपसभापती अरुण तांबे, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर भाऊ, प्रेमचंद पाटील, युवा सेना जिल्हा संघटक प्रशांत पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख निखिल भुसारे, शहर प्रमुख मनोज चौधरी, शहर प्रमुख हरीश देवरे,उपशहर प्रमुख खंडू सोनवणे पप्पू जाधव, भारत पाटील, सर्जेराव पाटील , रतन परदेशी, आनंदा पाटील, पितांबर मिस्त्री गोकुळसिंग गांगुर्डे, सांडू तडवी, अमोल महाजन, चंद्रकांत पाटील, गजू पाटील,भिकन तडवी, गुलाब पाटील, दिनकर गीते. असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

शेतकर्‍यांची दिवाळी गोड करापाचोर्यात महाविकास आघाडीचे आंदोलनसरकार विरोधात घोषणांनी जारगांव चौफुली दणाणले..                                                                            
Previous Post Next Post