**मानवत* नगर परिषद निवडणूक च्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटांची पालकमंत्री मेघना दिदीशी भेट*. (मानवत / प्रतिनिधी-)—————————*मानवत शहरात* ९ ऑक्टोंबर रोजी आगामी मानवत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर मानवत शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नुकतीच शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी आणि सदस्य यांनी भारतीय जनता पक्षाच्या परभणी जिल्हाच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांची भेट घेतली. या भेटीत मानवत नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. भेटीनंतर मानवत शहरातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, नागरिकांचे लक्ष या घडामोडीकडे वेधले गेले आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षांमध्ये युती होणार, आणि कोणती नवी समीकरणे तयार होणार, याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे.शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांचे एकत्र येणे हे मानवत शहरातील राजकारणा साठी मोठे पाऊल मानले जात असून, अशा संभाव्य युतीमुळे दोन्ही पक्षांची ताकद अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या गणिता मध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या बैठकीनंतर शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी “मानवत शहराच्या विकासासाठी आणि स्थिर नेतृत्वासाठी भाजप व शिवसेना एकत्र काम करणार” असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, विरोधक मात्र या हालचालीकडे ‘निवडणूकपूर्व राजकीय रणनीती’ म्हणून पाहत आहेत.मानवत नगरपरिषद निवडणूक जवळ येत असताना अशा भेटी-गाठींमुळे राजकीय तापमान आणखी वाढले आहे आणि शहरातील वातावरण रंगतदार झाले आहे.***

*मानवत*  नगर परिषद निवडणूक च्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटांची पालकमंत्री मेघना दिदीशी भेट*.         
Previous Post Next Post