दिव्यांग कल्याण आयुक्तालय म राज्य पुणे १ यांना जळगांव जिल्हातील दिव्यांग बाधवांच्या विविध समस्या चे निराकरण करणे साठी निवेदन. (यावल तालुका प्रतिनिधी( रविंद्र आढाळे) श्री अरुण पाटील (नायगावकर ) जिल्हा अध्यक्ष : भाजपा दिव्यांग आघाडी जळगांव जिल्हा (पुर्व ) यांनी पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालय म राज्य पुणे १ या ठिकाणी भेट देऊन कार्यालयात जळगांव जिल्हातील दिव्यांग बाधवांच्या विविध समस्या अडी अडचणीवर विचार विनिमय करून तश्या आशयाचे मागणीचे निवेदन सादर केले यावेळी मा आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय म राज्य पुणे हे मुंबई येथे मिटीग साठी गेल्याने त्यांच्या वतीने श्री कांबळे साहेब , व श्री गायकवाड साहेब यांनी श्री अरुण पाटील यांच्या हस्ते निवेदन स्विकारण्यात आले निवेदनात जि प समाज कल्याण दिव्यांग विभाग यांचे मार्फत दिव्यांग बाधवांना मिळणारे बिजभांडवल म्हणुन दिड लाख रु ची कर्जप्रकरणे संबंधीत बँकाकडे खितपत पडलेली आहे पण त्यांचा निपटारा करण्यात येत नाही तसेच दिव्यांग मंडामंडळ मुंबई बांद्रा पुर्व यांचे मार्फत ४% व्याज दराने दिव्यांगाना मिळणारे कर्जा साठी २ गव्हरमेन्ट जामीन दारांची जाचक अट रद करण्यात यावी त्यामुळे गरजु गरीब दिव्यांगाना जामीन मिळत नसल्याने ते या लाभापासून वंचीत रहात आहे मात्र सदन श्रीमंत दिव्यांगा कडे जामीनदार असल्याने त्यांना सहजपणे या कर्जाचा लाभ मिळत आहे यावर उपाय योजना करण्यात यावी असेही श्री अरुण पाटील यांनी मागणी करत ग्रामीण भागातील ग्रामपंचायती मार्फत दिव्यांगाना ५% निधीचे वाटप करताना वस्तु / साहीत्य / किराणा / या स्वरूपात निधी वाटला जात असुन यामध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार गैर व्यावहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे असेही श्री अरुण पाटील यांनी खेद व्याक्त करत यापुढे दिव्यांगांना ग्राप कार्यालया तील युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्यानांच गावातील निधी व दिव्यांगाची संख्या यांचा गुणाकार भागाकार करून त्यांचे वाटेला येणारी रक्कम थेट दिव्यांगाच्या बँकरवातेवर थेट स्वरूपाची जमा करण्यात यावी ज्या दिव्यांगानी अजुनही युडीआयडी कार्ड काढले नाही त्यांना ग्राप कार्यालयाने पत्र देऊन सुचित करावे यापरतही त्यांनी दुर्लक्ष केले तर ते ५% निधीपासून वंचीत रहातील असेही नोटीस मध्ये सुचवण्यात यावे असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे याबरोबरच शैक्षणिक / नोकरीविषयक / रोजगार विषयक / आरोग्य विषयक / आदीसह समस्यावर विचार विनिमय करून त्या बाबी निवेदनात नमुद करून सर्वातोपरी जळगांव जिल्हातील दिव्यांग बाधवांना सहकार्य करण्याची मागणी निवेदना द्वारे करीत लवकरच अजुन दिव्यांग कल्याण मंत्रालय म राज्य मुंबई येथील मुख्य सचिव श्री तुकाराम मुंढे यांचीही भेट घेणार असल्याचे श्री अरुण पाटील (नायगांवकर ) जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ( दिव्यांग आघाडी ) जळगांव जिल्हा (पुर्व) यांनी निवेदना द्वारे नमुद केलेले आहे
byMEDIA POLICE TIME
-
0