*पोलीस बांधवांनाही दिवाळीचा आनंद मिळावा दिवाळी बोनस जाहीर करावा!**महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकासभैय्या शेलार यांची मागणी*. राज्यातील पोलीस कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. सण, उत्सव, आंदोलन, अपघात किंवा संकटाची वेळ असो- पोलीस दल नेहमीच कर्तव्यावर सज्ज असते. त्यांच्या या निस्वार्थ सेवेला मान्यता देत पोलीस कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत विशेष बोनस देण्यात यावा, अशी ठाम मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकासभैय्या शेलार यांनी केली आहे.विकासभैय्या शेलार म्हणाले, "दिवाळीच्या सणात इतर सर्व विभागांना सुट्ट्या आणि आनंद लाभतो, परंतु पोलीस बांधव मात्र ड्युटी वरच असतात. त्यांच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी शासनाने विशेष दिवाळी बोनस जाहीर करावा. यामुळे त्यांच्या मनोबलात आणि आत्मविश्वासातवाढ होईल." ही मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग सदस्य राहुल भैय्या दुबाले, राज्य सचिव योगेश भैय्या कदम, राज्य सचिव (लीगल सेल) ॲड.आदर्श जाधव सर,शेवगाव तालुका अध्यक्ष दिपक मोहिते सर आणि सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी करण्यात आली आहे.या मागणीस पोलीस कर्मचारी, अधिकारी, निवृत्त पोलीस तसेच नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेलार यांनी सांगितले की, "पोलीस बांधवांच्या घरातही दिवाळीचा प्रकाश झळकला पाहिजे, हीच आमची खरी इच्छा आहे."शेवटी विकासभैय्या शेलार यांनी आवाहन केले"जे आपल्या सुरक्षेसाठी झटतात, त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी."
byMEDIA POLICE TIME
-
0