वाळू तस्करांनी तापी नदी पात्रात तलाठीला ट्रॅक्टरखाली जीवे मारण्याचा केला प्रयत्न : सोबत्यांनी वाचवले प्राण.. (चोपडा ( प्रतिनिधी )चोपडा तालुक्यातील बुधगाव ते जळोद रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना ट्रॅक्टर चालक आणि मालकाने ग्राम महसूल अधिकारी यांना थेट ट्रॅक्टरखाली ओढून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी ६ वाजता घडली आहे. महसूल अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालकावर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*अवैध वाळू चोरीची माहिती*तापी नदीच्या बुधगाव ते जळोद दरम्यानच्या पुलाखाली वाळूची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर प्रांत अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार हातेड भागातील मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी, संतोष कोळी, वर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सुधाकर महाजन, अकुलखेडेचे तिलेश पवार आणि बुधगावचे भूषण पवार यांचे पथक रविवारी पहाटे ४ वाजता कारवाईसाठी रवाना झाले.तापी नदीच्या बुधगाव ते जळोद दरम्यानच्या पुलाखाली वाळूची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर प्रांत अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार हातेड भागातील मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी, संतोष कोळी, वर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सुधाकर महाजन, अकुलखेडेचे तिलेश पवार आणि बुधगावचे भूषण पवार यांचे पथक रविवारी पहाटे ४ वाजता कारवाईसाठी रवाना झाले.*ट्रॅक्टर चालकाचा पळण्याचा प्रयत्न*सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बुधगाव गावाच्या हद्दीत, बुधगाव ते जळोद रस्त्यावरील पुलाखाली तापी नदीपात्रात पथकाला एक ट्रॅक्टर वाळू भरून येताना दिसला. पथकाने ट्रॅक्टरजवळ पोहोचून चालकाची चौकशी केली असता, ते ट्रॅक्टर अजय कोळी यांचे असल्याचे चालकाने सांगितले आणि महसूल पथकाला पाहून तो पळून गेला.*अधिकाऱ्याला ट्रॅक्टरखाली फेकले*ट्रॅक्टर जमा करून चोपडा तहसील कार्यालयात नेत असताना, ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी ट्रॅक्टरवर बसले होते. यावेळी ट्रॅक्टर चालक विजय पावरा आणि ट्रॅक्टर मालक अजय कैलास कोळी (दोघेही रा. बुधगाव)यांनी रस्त्यात अडथळा निर्माण केला आणि ट्रॅक्टर घेऊन जाऊ देणार नाही, असे सांगत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चालक विजय पावरा याने ट्रॅक्टरवर बसलेल्या अनंत माळी यांची कॉलर पकडून त्यांना खाली ओढले आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने थेट ट्रॅक्टरच्या मागील चाकाच्या समोर फेकून दिले.*प्रसंगावधानमुळे वाचला जीव*हा प्रकार पाहून सोबत असलेले मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी प्रसंगावधान साधले आणि त्वरीत अनंत माळी यांना बाजूला ओढले. त्यामुळे माळी यांचा जीव वाचला, मात्र या घटनेत त्यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर चालक विजय पावरा आणि मालक अजय कोळी यांनी ट्रॅक्टरमधील वाळू खाली ओतून ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.जखमी झालेले ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी यांना उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विजय पावरा आणि मालक अजय कोळी यांच्याविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि इतर गंभीर कलमांखाली चोपडा ग्रामीण
byMEDIA POLICE TIME
-
0