अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत रॅली* *संवेदनशीलतेचा संदेश देत यशस्वी सांगता”. (*मानवत / वार्ताहर {अनिल चव्हाण.}——————————दिनांक १० ऑक्टोबर रोजी येथील के. के. एम. महाविद्यालय, मानवत यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत रॅलीचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मा. विजयकुमारजी कत्रूवार यांच्या हस्ते निधी संकलनाचा प्रारंभ के.के.एम. महाविद्यालयात करण्यात आला.या रॅलीचा मुख्य उद्देश फक्त निधी संकलन नव्हता, तर समाजात संवेदनशीलता आणि सहानुभूती जागवणे हा होता.कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिता कुकडे, डॉ सत्यनारायण राठी प्रा .डॉ .चेतनकुमार व्यास यांनी रॅली पूर्वी मुलांना रॅली सहभागी होण्यासाठी आव्हान करताना“ही रॅली केवळ चालण्यापुरती नव्हती, ती संवेदनशीलतेचा एक ठसा प्रत्येकाच्या मनात उमटवून गेली. आपली मदत ही केवळ आर्थिक नसून भावनिक आधाराची आहे. ‘मी नव्हे आपण’ — हीच राष्ट्रीय सेवा योजनेची खरी भावना आहे.” रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी गावागावात लोकांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.रॅलीत माननीय प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, प्रा अनिल कापसे,डॉ. गिते बाळासाहेब, डॉ. योगेश बागुल, डॉ सारिका सावंत, प्रा. साबळे पांडुरंग,प्रा. सोळंके अनिल,प्रा. हिबारे विनोद,प्रा. खोब्रागडे डी. ए, प्रा. अशोक काकडे, प्रा. चोपडे विनायक, प्रा, घुमानवाड एस. एस,प्रा. आशुतोष कच्छवे, प्रा. आर. शेख, प्रा. राहुल यादव, प्रा. राजनंदनी मुळे,श्री. भाऊसाहेब नखाते संस्थेचे सचिव श्री. बालकिशनजी चांडक यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. नगरपालिकेचे अधीक्षक श्री. प्रसाद पोते यांनी रॅलीचे सांगता केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी व स्वयंसेवकांनी "शेतकरी वाचला तरच देश टिकेल", "एक रुपया, एक हात, एक भावना" अशा घोषणांद्वारे समाजाला एक हृदयस्पर्शी संदेश दिला.रॅलीची सांगता “जय हिंद! जय शेतकरी! जय जवान जय किसान!” या घोषणांनी झाली. ही रॅली सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली असून, विद्यार्थ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता व एकजूट कौतुकास्पद मानली जात आहे. रॅलीमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.***

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत रॅली* *संवेदनशीलतेचा संदेश देत यशस्वी सांगता”.                                    
Previous Post Next Post