देवगिरी नागरी सहकारी बँके कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपयांची मदत. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : महाराष्ट्र राज्यात विशेषतः मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अत्यंत मोठे नुकसान झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी आपली सामाजिक संवेदना दाखवत आपण समाजाप्रती काही देणे लागतो या भावनेतून देवगिरी नागरी सहकारी बँकेकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे छत्रपती संभाजी नगर येथे आले असता त्यांना विमान तळावर भेटून पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे.देवगिरी नागरी सहकारी बँक गेल्या 40 वर्षांपासून बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असून सोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत.बँकेने आज पर्यंत महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या वेळी संकट आली त्या त्या वेळी आपली सामाजिक संवेदना दाखवत काहीना काही खारीचा वाटा उचलून आपले सामाजिक दायित्व दाखवले आहे.1996 व 2006 मध्ये पैठण येथील पूरग्रस्थासाठी आर्थिक मदत केली होती.त्याच बरोबर बँकेचे अध्यक्ष मा.किशोरजी शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या वत्तीने सामान्य नागरिकांना मोफत औषधे,मास्क, जीवनाश्यक असणाऱ्या अनेक किराणा सामानाच्या किट्स आदी वाटप केल्या होत्या. मा . अध्यक्ष किशोर जी शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देवगिरी नागरी सहकारी बँक गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून आपलया ठेवीदार, कर्जदार आणि ग्राहकांशी संवाद साधत वेळोवेळी चागल्या सुविधा व सेवा देण्यात यशस्वी झाल्याचे निदर्शनास येत आहे. मा. अध्यक्ष किशोर जी शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या कार्य प्रणाली यशस्वी वाटचाल पाहून R.B.I. ने 10 जुलै 2025 रोजी देवगिरी नागरी सहकारी बँकेला शेड्यूलड बँकेचा दर्जा देण्यात आल्याचे पत्र दिले आहे.बॅक नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या दुःखात आपले सामाजिक दायित्व दाखवत मुख्यमंत्री छत्रपती संभाजी नगर येथे आले असता त्यांना विमान तळावर भेटून पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला या वेळी देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर जी शितोळे साहेब देवगिरी नागरी सहकारी बँकेचे संचालक अँड. सागर विद्युष, ॲड. मुकेश गोयंका , डॉ.प्रियांका तल्हार, डॉ.क्षमादेवी खोब्रागडे, अमिता लेकुरवाळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0