पोलीस ठाणे वर्धा शहर दिनांक १५/११/२०२५दिनांक १५/११/२०१५ रोजी प्राप्त माहीतीचे आधारे मौजा केजाजी चौक गौंड प्लॉट, वर्धा येथे राहणारे प्रकाश तळवेकर यांचे घराच्या तीसऱ्या मजल्यावर राहणारे किरायेदार हे त्यांचे रूमध्ये बनावटी चलनी नोटा तयार करून बाळगुण आहे. अशी माहीती प्राप्त झाल्याने पोलीस ठाणे वर्धा शहर येथील ठाणेदार श्री. संतोष ताले पोलीस निरीक्षक, यांनी सदरची माहीती मा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांना देवून मा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे सदर खबरेवर छापा टाकून कार्यवाही करणे असल्याने पोलीस ठाणे वर्धा शहर येथील पोलीस उप निरीक्षक श्री. सिनुकुमार बानोत, पोहवा विवेक बन्सोड /२३७, पोहवा लोभेश गाडवे/४७६, पोशि समीर खोब्रागडे/१५३९, पोशि अमोल /१७३८ असे पोलीस पार्टीने नमूद खबरेवर पंचासह छापा टाकला असता सदर ठिकणी एक बालक अ, ब, क मिळून आला व खबरेप्रमाणे सदर ठिकाणी झडती मध्ये एकुण १४४ भारतीय चलनातील ५००/रुपयांची नकली बनावटी नोटा, प्रींटर, १२/१२ इंचची लाकडी फ्रेम, ६/६ इचची लाकडी फेम, १२/१८ इंचची काचेची फ्रेम, ए४ साईज चे पेपर, इंक बॉटल व इतर साहीत्य मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणात अधिक तपास केला असता असे दिसून येत आहे की, सदर गुन्हयातील मुख्य आरोपी ईश्वर लालसींग यादव हा आपले साथीदार धनराज धोटे, राहूल आंबटकर व विधी संघर्षीत बालक अ, ब, क यांचे सोबत मिळून नकली नोटा तयार करण्याचा काम करीत होता व गावो-गावी आठवडी बाजारात साथीदारांना पाठवून नकली नोटा चलनात आणत होता. तपासात असेही समोर आले आहे की, मुख्य आरोपी ईश्वर यादव चे दोन साथीदार धनराज धोटे व राहूल आंबटकर यांना नाशिक येथे नकली नोटा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेण्याची प्रक्रीया करण्यात येईल. ईश्वर यादव हा सध्या फरार असून त्याचे शोधकामी तीन वेग-वेगळे पथक तयार करून रवाना करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि प्रमोद रासकर व त्यांचे पथक करीत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0