ग्रामरोजगार सेवकाचा भ्रष्ट कारभारा मुळे सुरजखोड रामपूर रामेश्वर गट ग्रामपंचायत येथे आमरण उपोषण सुरू आज २ रा दिवस.. धर्माबाद: सोमवार, १७ नोव्हेंबर पासून सुरजखोड गट ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. भ्रष्ट ग्राम पंचायत च्या गलथान कारभार व ग्रामरोजगार सेवकाने गावातील अनेक घरकुल लाभार्थ्यांची पैसे परस्पर विश्वासात न घेता (मस्टर) लेबर बजट चे पैसे उचलून घेतल्या बाबत, सण २०१८ मध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाने घरकुलाचे मस्टर काढणाऱ्या रोजगार सेवकाची अद्याप चौकशी करून कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे नागरिकांना अनावश्यक त्रास दिल्याबद्दल या उपोषणाला सुरुवात करण्यात येत आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी दि १७ नोव्हें २०२५ रोजी ११:०० वाजता उपोषण सुरू झाले. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून उपोषण कर्त प्रकृती बिघडली आहे गटविकास अधिकारी व प्रशासन चे लक्ष दिसत नसून कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे. उपोषणकर्ते यांनी न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असे प्रशासनाला आवाहन केले आहे.१५ऑगस्ट रोजी ग्राम सभेत हा मुद्दा मांडला होता तर जे जे लोकांची नावे आली आहे त्यांना पैसे देऊन निलंबित करण्यात येईल असे वचन देण्यात आले होते,पण आता उडवा उडवी ची उत्तरे देण्यात येत आहे, असे गावातील ज्येष्ठ लोकांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास होत आहे. ही कार्यवाही करण्यासाठी,गावातील सर्व नागरिक उपोषणकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले आहेत. सय्यद हिलाल अली आरिफ अली  यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे. या धोका व त्रास दिल्याबद्दल त्यामुळे ते सर्व उपोषण नेते सय्यद हिलाल अली यांच्या पाठिंब्याने आहेत. न्याय मिळेपर्यंत व कार्यवाही करेपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे उपोषण नेत्याने सांगितले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांनी उपोषण स्थळी भेट देऊन नेत्याला प्रोत्साहन दिले.तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष

ग्रामरोजगार सेवकाचा भ्रष्ट कारभारा मुळे सुरजखोड रामपूर रामेश्वर गट ग्रामपंचायत येथे आमरण उपोषण सुरू आज २ रा दिवस..                                                                                             
Previous Post Next Post