*नागपूर व समाज कल्याण विभाग जि प जळगाव यांच्या विद्यमाने वस्तीगृह विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निबंध स्पर्धा संपन्न*. धी.शेंदुर्णी एज्यु.कोऑप सोसा. संचलित,आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री हरिप्रसाद महाराज संमिश्र वस्तीगृह शेंदुर्णी येथे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर व समाज कल्याण विभाग जि प जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील वस्तीगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 विषय संविधानातील मूलभूत कर्तव्य व नागरिकांची भूमिका या विषयाला अनुसरून राज्यभरातील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धा विभाग प्रतिनिधी सतीश धस समाज कल्याण अधिकारी जि प जळगाव तसेच डॉक्टर चेतनकुमार साळुंके समाज कल्याण निरीक्षक स.क जळगाव यांच्या निरीक्षणात्मक संयोगाने शेंदुर्णी येथील श्री हरिप्रसाद महाराज संमिश्र वस्तीगृह शेंदुर्णी येथे पार पडल्या.याप्रसंगी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी सर,तसेच स्थानिक आयोजक शकील पटेल,परीक्षक एल.पी मोहने,आर आर सोनवणे,कैलास शेळके,कैलास पाटील,अरुण गरुड,अनिल खाकरे, पंढरी कोळी, संजय पोस्ते,अनिल माळी,श्याम राठोड,दत्ता पाटील, किरण इंगळे,अविनाश सोनवणे,इत्यादी वस्तीगृह अधीक्षक व चौकीदार यांच्या कृतीयुक्त सहभागाने जिल्हाभरातून एकूण नऊ वस्तीगृहातील 75 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला वस्तीगृह अधीक्षक व चौकीदार यांच्या कृतीयुक्त सहभागाने जिल्हाभरातू या राज्यस्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने राज्यस्तरावरून या केंद्राची दखल घेण्यात आली.

*नागपूर व समाज कल्याण विभाग जि प जळगाव यांच्या विद्यमाने वस्तीगृह विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निबंध स्पर्धा संपन्न*.                                                                                  
Previous Post Next Post