पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशाने पोस्टे परिसरात होणाऱ्या नगरपालिका निवडणूक संबंधाने दारू, गांजा विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमावर कार्यवाही करणे बाबत आदेशित केले असता व सदर कार्यवाही संबंधाने सपोनी पद्माकर मुंडे ,पोहवा प्रशांत ठोंबरे पथकासह पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मूखबीर कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, पवन पवार नावाचा इसम त्याचे ताब्यातील दुचाकी मोपेड वाहनाने ढाबा रोडनी हिंगणघाट कडे दारुचा माल घेऊन वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर खबरे वरून सदर माहीती पोलीस निरीक्षक श्री अनिल राऊत यांना देवून त्याचे मार्गदर्शनात पंच व पोस्टाँप सह नाकेबंदी करीत असताना माहितीप्रमाणे एक मोपेड वाहन येताना दिसल्याने पो. स्टॉप चे मदतीने नाकेबंदी करून थांबवून पंचांसमक्ष मोपेड चालक या विचारपूस केली असता त्याने पवन गिरगुट पवार वय 25 वर्ष राहणार कुटकी ता.हिंगणघाट यांचे ताब्यातून एक चुंगडीत1) 05 प्लास्टिक पन्नीमध्ये 100 लिटर गावठी मोहा दारू किंमत 15,000रू, 2) सुझुकी कंपनीची बर्गमन मोपेड क्र MH 32 AY 6724 कीं 90,000रू असा एकूण जुमला किंमत 1,05,000रू चा माल बिना पास परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने पोलीस ठाणे हिंगणघाट येथे अपराध क्रमांक /2025 कलम 65(अ )(ई ),दारूबंदी कायदा सहकलंम 3(1),181,130/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन सा , मा.अप्पर पोलीस अधीक्षक,सदाशिव वाघमारे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक व मा., पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे इन्चार्ज सपोनि पद्माकर मुंडे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पो.ना निलेश सूर्यवंशी, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, रोहित साठे यांनी केली..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byMEDIA POLICE TIME
-
0