आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची चोपडा,फैजपूर, यावल नगरपरिषद व नगरपंचायत ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती... (चोपडा( संजीव शिरसाठ)-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था -नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने आ.प्रा.चंद्रकांतजी सोनवणे यांचीचोपडा,फैजपूर,यावल नगरपरिषद यांच्या ‘निवडणूक प्रभारी’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून तसे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या नियुक्ती बद्दल चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0