श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती पर्वावर*श्री संताजी जगनाडे महाराज संतत्व व कवित्व* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ... दिनांक ८ डिसेंबर 2025 रोजी डॉ. श्री वसंतरावजी जामोदे माजी उपकुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या शुभहस्ते व श्री शंकररावजी हिंगासपुरे, श्री रंगरावजी भागवत, श्री. रामेश्वरजी गोदे,श्री. अण्णासाहेब नालसे या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संताजी भवन उषा कॉलनी एम आय.डी.सी रोड अमरावती येथे थाटामाटात संपन्न झाला.सदर पुस्तक हे प्रा.श्री विजय जयसिंगपुरे यांनी लिहिले असून प्रकाशक म्हणून संताजी सेना बहुउद्देशिय संस्था अमरावती द्वारा प्रकाशित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अरूण भाऊ गासे अध्यक्ष संताजी सेना बहुउद्देशिय संस्था यांनी केले. तर सर्व उपस्थितांना पुस्तक परिचय श्री. मा.बा.राऊत यांनी करून दिला.सदर कार्यक्रमातून संताजी जगनाडे महाराजांच्या कार्यावर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख मान्यवरांनी प्रकाश टाकला. डॉ. वसंतराव जामोदे सरांनी संताजी महाराजांच्या जिवन पटावर सुंदर प्रकाश टाकून सदर पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे महत्व अधोरेखीत केले. सदर कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी व श्री प्रमोद गोधनकर,जयंत मुळे,आशिष खोडके,श्री.अमित जामोदे,श्री. रमेश बोके, श्री.शितल राऊत, सौ मिना गासे, इ.संताजी सेना बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तनमनधनानं सहकार्य केले. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या भागातून समाजबांधवांनी व सामाजिक क्षेत्रातील गणमान्य मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून सर्व उपस्थितांना अल्पोहार व चहापाणी देऊन सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती पर्वावर*श्री संताजी जगनाडे महाराज संतत्व व कवित्व* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ...                                                                  
Previous Post Next Post