जी .व्ही .एम. भवन्स च्या यथार्थ जनईकरचे सुयश.. हिंगणघाटदिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव येथील पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त नोबल फाउंडेशन आणि भवरलाल आणि कांताई जैन फाउंडेशन यांच्यावतीने राजीव तांबे यांचे ' मुलांचा अभ्यास व पालक 'या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी डायटचे निवृत्त प्राचार्य नीलकंठ गायकवाड ,बच्छाव मोटर्सचे किरण बच्छाव , विद्यार्थी सहाय्यक समितीचे एस एस राणे , राज्यकर अधिकारी राहुल पाटील ,ग्लोबल मिशन इंग्लिश शाळेचे मनोहर पाटील , पोद्दार जीनियस इंटरनॅशनल स्कूल चे नितीन पाटील ,जैन इरिगेशनचे अनिल जोशी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी नोबल फाउंडेशन ,जळगाव तर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय विज्ञान पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील भवन्स जी.वी.एम येथील दहावीचा विद्यार्थी यथार्थ कौस्तुभ जन‌ईकर यास राज्यस्तरीय डॉ .ए.पी.जे अब्दुल कलाम बाल वैज्ञानिक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आले. शाल , पुस्तक, सन्मानपत्र,२१०० रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अमळनेर येथील ' मिलके चलो' असोसिएशन ,जळगाव येथील ' युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया ' ,नंदुरबार येथील समूहदर्शक क्लासेस , उमेश इंगळे.यांना डॉ. सी. व्ही. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार नोबल फाउंडेशन तर्फे प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोबल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी केले. विवेक साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले.शहर प्रतिनिधी

जी .व्ही .एम. भवन्स च्या यथार्थ जनईकरचे सुयश..        
Previous Post Next Post