राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद ---- सहदेव तितूर =============================================. बाळापूर -- बाळापूर तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा देगाव येथे श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था बुलढाणा अंतर्गत राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.त्या संदर्भात सविस्तर माहिती संस्थेचे संस्थापक श्री सचिन वायाळ सर व मुख्य समन्वयक श्री अजय जाधव सर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना बालवयात त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी यासाठी प्रभावशाली हा उपक्रम राबविला जात आहे.जेणेकरून विद्यार्थी हा सर्वांगीण विकासासाठी चालना मिळावी व ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा ची आवड निर्माण व्होवून स्पर्धात्मक युगात त्यांचा निभाव होईल आणि भविष्यात विद्यार्थ्यांची जडणघडण होवून त्यांचे करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील पायाभरणी करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सविस्तर स्काॅलरशिप बदल माहिती दिली जाते आहे यासाठी तालुका स्तरावर समन्वयक सुध्दा निवड केली असून वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर समन्वयक श्री संजय भरदुक व अकोला जिल्हातील बाळापूर येथे श्री सहदेव तितूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.शाळेला व्हिजीट देऊन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा बद्दल व समज उपक्रम बद्दल सविस्तर माहिती देण्यात येत आहे याला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0