*मा. श्री. राजेश जी बकाने आमदार यांना, ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने निवेदन देण्यात आले. (*महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.18:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारार्थींना विविध सवलती उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन दिनांक 18/12/25 रोजी देण्यात आले. ऑल इंडिया बंजारा टायगर्स व महाराष्ट्र शासन पुरस्कृत व्यक्ती व संस्था संयोजन समिती, महाराष्ट्रच्या वतीने महाराष्ट्र मध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते तळागाळातील गोरं गरीब व वंचित व भटके आती मागास समुह यांच्या सामाजिक विकासासाठी अहोरात्र झटत असतात. सामाजिक सेवेचा वसा हाती घेऊन काम करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्याची व्यथा कोणी मांडतांना दिसत नाही अशा वेळी. ऑल इंडिया बंजारा टायगर्स चे डॉ अशोक दिगांबर जाधव राष्ट्रीय महासचिव यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाला निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना दर वर्षी पुरस्कृत केले जाते व त्यानं वा-यावर सोडले जाते. अशा वेळी डॉ. अशोक जाधव यांनी या सामाजिक कार्यकर्त्यांच्या समस्या लक्षात घेऊन खाली मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री, राज्यमंत्री यांच्या पर्यंत पोहोचावे करीता स्थानिक आमदार राजेश जी बकाने यांना सुपुर्द केले.*निवेदनातील प्रमुख मागण्या*१) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन पुरस्कृत व्यक्ती व संस्था यांचे २ प्रतिनिधी यांना देशांतर्गत विमान सेवा, रेल्वे सेवा, बस सेवा मध्ये मोफत प्रवास सवलत देण्यात यावी.२) शासकीय विश्राम गृहामध्ये मोफत निवास व भोजन सवलत देण्यात यावी.३) वयोवृद्ध पेन्शन सवलत व विमा सुरक्षा सवलत देण्यात यावी. महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते सामाजिक कार्यात आपले योगदान देत असतांना कधी कधी आर्थिक भार त्यांच्या कुटुंबावर पडत असतो, त्यामुळे किमान पडणारा आर्थिक कमी होण्यासाठी वरील प्रकारच्या मागण्याचा शासन स्तरावर विचार करून महाराष्ट्र शासनाने योजना लागू कराव्या करिता ऑल इंडिया बंजारा टायगर्स व महाराष्ट्र शासन पुरस्कृत व्यक्ती व संस्था संयोजन समिती महाराष्ट्र-शाखा वर्धा च्या वतीने सदर निवेदन देण्यात आले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0