जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा कोठारी शाळेला सदिच्छा भेट -- (संजय भरदुक विशेष जिल्हा प्रतिनिधी वाशिम)============================================मंगरुळपीर- मंगरूळपीर तालुक्यातील जि.प.वरिष्ठ ‌प्राथमिक केंद्र शाळा कोठारी येथे श्रीमत् शिक्षण व ग्रामीण विकास संस्था बुलढाणा अंतर्गत राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ची परीक्षा आयोजित करण्यात येत आहे.त्या संदर्भात सविस्तर माहिती संस्थेचे संस्थापक श्री सचिन वायाळ सर व मुख्य समन्वयक श्री अजय जाधव सर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना बालवयात त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी यासाठी प्रभावशाली हा उपक्रम राबविला जात आहे.जेणेकरून विद्यार्थी हा सर्वांगीण विकासासाठी चालना मिळावी व ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा ची आवड निर्माण व्होवून स्पर्धात्मक युगात त्यांचा निभाव होईल आणि भविष्यात विद्यार्थ्यांची जडणघडण होवून त्यांचे करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील पायाभरणी करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सविस्तर स्काॅलरशिप बदल माहिती दिली जाते आहे यासाठी तालुका स्तरावर समन्वयक सुध्दा निवड केली असून वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर समन्वयक श्री संजय भरदुक व अकोला जिल्हातील बाळापूर येथे श्री सहदेव तितूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी हे तालुक्यातील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात येत असून या परिक्षेसाठी यांना विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.तसेच शाळेला व्हिजीट देऊन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा बद्दल व समज उपक्रम बद्दल सविस्तर माहिती देण्यात येत आहे याला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच कोठारी येथील शाळेला भेट दिली असता असे आढळले की शाळा कशी असावी प्रत्यक्ष अनुभव आला तेथील सर्व राबविण्यात आलेले उपक्रम नियोजन बद्ध व्यवस्थित सुंदर अशी शाळा वाटली तसेच सुंदर अशी परसबाग की जी विषमुक्त सेंद्रिय खतापासून भाजीपाल्याची लागवड केली आहे.तेथील मुख्याध्यापक श्री अनिल वाढणकर सर व उमेश गहूले सर यांनी खूप परिश्रम घेतले आहे असे दिसून आले आणि त्यांना इतर शिक्षकांचा , शिक्षिका यांचे सुध्दा सहकार्य चांगला सहभाग मिळाला असे दिसून आले तसेच गावातील ग्रामस्थांचा महत्त्वाचा सहभाग लाभला. आदर्श घेण्यासारखा प्रेरणादायक अविस्मरणीय अशा मला अनुभव आला.

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा कोठारी शाळेला सदिच्छा भेट  --                                                
Previous Post Next Post