नांदगावला लॅपटॉप मागणीसाठी तलाठ्यांचा कामकाजावर बहिष्कार.महसुली नोंद होत नसल्याने शेतकरी खातेदारांमध्ये नाराजी.. (नाशिक जिल्हा विभागीय प्रतिनिधी)नांदगाव । तालुक्यातील तलाठीसंघटनेने मंडळ अधिकारी व तलाठीयांना नवीन लॅपटॉप व प्रिंटर कम स्कैनरउपलब्ध न करून दिल्यामुळे ऑनलाईनकामकाजावर हे मुदत बहिष्कार करण्यातआला असून तलाठी डीएससी जमा केल्यामुळेनांदगाव तालुक्यातील महसूल प्रशासनाचेकामकाज ठप्प झाले आहे. तालुक्यातीलतलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी बेमुदतबहिष्कार पुकारल्यामुळे नागरिकांची मोठीगैरसोय झाली आहे.आयटी उपकरणांचे आयुष्यमान पाच वर्षेइतके असल्याचे शासन निर्णय नुसार निश्चितकरण्यात आले आहे. परंतु या उपकरणांचावापर अधिक झाला आहे. ही उपकरणेकालबाह्य व नादुरुस्त, नित्कृष्ट अवस्थेतआहेत. या उपकरणांची कार्यगति फारच कमीआहे. पंचनामा प्रणाली सह ई हक्क सारख्यासुधारित प्रणालीवर कामे करणे अशक्य होतनाही. त्यामुळे ऑनलाइन सेवा वेळेत देतानाअडचणी निर्माण होत आहेत. अधिकारी वकर्मचाऱ्यांंना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावेलागत आहे. कामकाजाच्या तणामुळे कर्मचारीवर्गात मानसिक तणाव व असंतोष निर्माणहोत आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होतआहे. त्यामुळे नवीन उपकरणे देण्यात यावीअशी मागणी शासनाकडे करण्यात आलीआहे. शासन निर्णय असूनही उपकरणे खरेदीप्रक्रिया रखडली आहे. शासनाच्या धोरणाचीयातून उल्लंघन होत असल्याचा आरोप तलाठीव मंडळ अधिकारी यांच्याकडून करण्यातआला आहे. सजेसाठी केवळ 38 तलाठीकार्यरत असल्याने नागरिकांच्या महसूलविषयक कामांबाबत तिरंगी होत असल्याच्यानागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यातच जुनी वजीर्ण झालेली लॅपटॉप, प्रिंटर कम-स्कैनर वरकाम करणे अशक्य झाल्यामुळे कामकाजाचीगती अधिकच मंदावली होती. वाढत्याअतिरिक्त जबाबदारीमुळे काम करणे कठीणझाल्यामुळे हा बहिष्कार पुकारण्यात आला.राज्य शासनाने तातडीने नवीन उपकरणेउपलब्ध करून द्यावी अशी मागणी तालुकातलाठी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.या आंदोलनात नांदगाव तालुका संघाचेअध्यक्ष जे. एम. मलवुडे, सागर जोपळे, तुपारबोडखे, शुभम भटकर, कपिल मुलो पवार,भिमा भागवत, प्रिया गाडेकर आदी सहभागीझाले होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0