*'खाकी'तील कुकर्मी ने खात्याला फासला काळिमा! हॉटेलच्या खोलीत नर्ससोबत रंगरेलियां साजरा करणाऱ्या पोलिसाची नर्सच्या पतीनेच जिरवली*. यवतमाळचा हायव्होल्टेज ड्रामा: 'नाईट शिफ्ट'चा बहाणा करून प्रियकराला भेटायला गेली पत्नी; पतीने रंगेहाथ पकडून घेतला पी सी आरयवतमाळ पोलिस सध्या वेगवेगळ्या करणाऱ्याने सतत चर्चेत राहत आहे,कधी अवैध्य व्यावसायिकान सोबत हात मिळवणी,तर कधी लाच,तर कधी गुंडगिरी,आणि आता चक्क आता तर दुसऱ्याच्या पत्नी सोबतच प्रेम प्रकरण सध्या यवतमाळ पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात तैनात असलेल्या एका पोलीस शिपायाला एका विवाहित परिचारिकेसोबत हॉटेलच्या खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले.या बाबत पतीला अगोदरच संशय असल्याने आपली पत्नी खरोखरच हि कर्तव्यावर जाते की कुठे जाते म्हणून त्याने तिचा पाठलाग केला आणि ती बिनधास्त हॉटेल मध्ये गेल्याचे निदर्शनास आले आणि काही वेळ थांबून पतीही तिथे गेला आणि पत्नीला परपुरुषासोबत पाहताच संतापलेल्या पतीने पोलिसाच्या वर्दीचा कोणताही धाक न बाळगता त्याची हॉटेलमध्येच यथेच्छ धुलाई केली. विशेष म्हणजे, या शिपायाला बदडण्यासाठी पोलिसांच्याच दंडुक्याचा वापर करण्यात आल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. ८ डिसेंबरच्या रात्री घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.रुग्णालयातून सुरू झाली 'प्रेमकथा', हॉटेलमध्ये झाला 'द एन्ड'मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला शहरातील एका शासकीय मिनी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वी पोलीस मुख्यालयातील एका शिपायाशी तिची ओळख झाली. हॉस्पिटल परिसरातून सुरू झालेल्या या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमसंबंधात झाले. गेल्या काही काळापासून दोघेही सुट्या काढून किंवा ड्युटीवर असल्याचे सांगून एकमेकांना भेटत होते. मात्र, पत्नीच्या वागण्यातील बदल पाहून पतीला संशय आला आणि त्याने तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली.'नाईट शिफ्ट'चा बनाव आणि पतीची 'फिल्डिंग'८ डिसेंबर रोजी परिचारिकेने रात्री रुग्णालयात 'नाईट शिफ्ट' असल्याचे घरी सांगितले. ती दोघांसाठी जेवणाचा डबा घेऊन घराबाहेर पडली. मात्र, पती आधीच सावध होता, त्याने तिचा पाठलाग केला. परिचारिका रुग्णालयात न जाता थेट शहरातील एका हॉटेलमध्ये पोहोचली, जिथे तो पोलीस शिपाई आधीच तिची वाट पाहत होता. दोघेही खोलीत जाताच, पाळतीवर असलेल्या पतीने आपल्या एका मित्राच्या मदतीने खोलीचा दरवाजा उघडला आणि दोघांनाही रंगेहाथ पकडले.हॉटेलमध्ये पोलिसाचा 'राडा'; पोलिसांच्याच काठीने दिला प्रसादआपला संसार उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून पतीचा संयम सुटला. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने शिपायाला खोलीतच कोंडले आणि त्याला बेदम चोप दिला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, त्या शिपायाला मारण्यासाठी पोलिसांच्याच अधिकृत दंडुक्याचा वापर करण्यात आला. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या गदारोळामुळे कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी धाव घेतली, परंतु प्रकरण आपल्याच विभागाशी संबंधित असल्याने आणि बदनामी टाळण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.पतीचा आक्रमक पवित्रा: "माझा संसार मोडला, आता यांची नोकरी घालवणार"या घटनेनंतर पतीने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. त्याने पत्नीला घरातून हाकलून दिले असून तो आता कायदेशीर कारवाईसाठी ठाम आहे. अधीक्षकांकडे तक्रार: पतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना पत्र लिहून संबंधित शिपायाला सेवा मुक्त करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल करण्याची तयारी आरोपी शिपाई आणि पत्नी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पतीने प्रस्ताव तयार केला आहे. पतीचा दावा आहे की, त्याच्याकडे हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर महत्त्वाचे पुरावे उपलब्ध आहेत.त्या मुळे पोलिस अधीक्षक पोलिस शिपायास पाठीशी घालणार की एका सामान्य व्यक्तीला न्याय देणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विवादित हॉटेल्स पुन्हा चर्चेतशहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या हॉटेलमध्ये विना ओळखीचा पुरावा किंवा संशयास्पद हालचालींना खतपाणी घातले जात असल्याचा आरोप होत आहे. अशा हॉटेल्सवर प्रशासन कधी कारवाई करणार, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. शिस्तीचे धडे देणाऱ्या 'खाकी'मधील काही कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण विभागावर नामुष्की ओढवल्याची भावना प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0