हिंगणघाट शहरातील संत गाडगेबाबा वॉर्ड, जुनी वस्ती येथील रहिवासी दक्ष आनंद गिरी (वय १५) हा मुलगा १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. याबाबत हिंगणघाट शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी आमदार समीर कुन्नावार साहेब यांच्या कार्यालयाजवळील तलावात दक्ष गिरी याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार दक्षला पतंग उडवण्याचा छंद होता. पतंग उडवण्याच्या नादात तो तलावाच्या परिसरात गेला असावा आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पोलीस/मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.सदर प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट शहर पोलीस करीत आहेत..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0