महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटलांसाठी लढणारी कार्यरत राहून पाटलांच्या सदैव सोबत असणारी एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघ.राज्याध्यक्ष आदरणीय श्री बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाला तोड नाही दांडगी नेतृत्व शैली शासनस्तरावर असलेला दबदबा आणी मागणी रेटून लावून ती शासन स्तरावर पूर्णत्वास नेण्याची क्षमता असलेलं एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब म्हणून अशा व्यक्तिमत्वासोबत त्यांच्या लढ्यात सहभागी होऊन पोलीस पाटील या पदाला न्याय मिळून देण्याची क्षमता ज्या संघात आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघ. आज दिनांक 14 ला समुद्रपूर तालुक्याची कार्यकारिणी स्थापन करण्याच्या अनुषंगाने वर्धा जिल्हा गाव कामगार संघाच्या वतीने समुद्रपूर येथील शासकीय विश्राम गृह येथे छोट्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेच्या अध्यक्ष स्थानी आपल्या वर्धा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री अमितजी लुंगे पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे जिल्हा सचिव श्री जनार्धनजी भगत हे प्रामुख्याने उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजयजी वाघमारे पाटील,नवनियुक्त जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री त्रंबक जी गोहणे पाटील,उपाध्यक्ष श्री भालचंद्र जी डफ पाटील, श्री कृष्णाजी वादाफळे पाटील, श्री जयंतजी वाकडे पाटील,श्री नरेशजी वांढरे पाटील, वर्धा जिल्हा सहसंघटक श्री गणेशजी धोटे पाटील आणि श्री साचिन महाकाळे पाटील, सेलू तालुका उपाध्यक्ष श्री निलेशजी मूडे पाटील, सेवा निवृत्त पोलीस पाटील श्री यज्ञपाल जी छोयले आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री सचिनजी ठवरी यांच्या प्रमुख उपस्थित होते.आज याठिकाणी समुद्रपूर तालुका अध्यक्ष आणि समुद्रपूर स्टेशन अध्यक्ष या पदावर खैरगावं येथील उच्चशिक्षित कर्तबगार तरुण पोलीस पाटील श्री कुंदनसिग छोयले पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.तालुका सचिव पदी श्री राजूभाऊ दांडेकर तर सहसचिव म्हणून श्री अतुलजी भटे यांची निवड करण्यात आली.तालुका उपाध्यक्ष पदी श्री चंद्रकांत बहाद्दूरे आणि श्री विनोदजी बोरकुटे यांची निवड करण्यात आली.कोषाध्यक्ष म्हणून श्री बाबाराव शंभरकर यांची तर सहकोषाध्यक्ष म्हणून श्री शंकरराव वैद्य यांची निवड करण्यात आली. तालुका समन्वयक पदी श्री मारोती हुलके यांची निवड करण्यात आली.सदस्य पदी सर्वश्री राजू मडावी,प्रकाश भगत,किसनाजी कोल्हे,प्रतीक घाडगे, राजू बारई,विजय थुटे, विनोद बोरेकर,रोशन बाभडे,सेविन चाफले,महेंद्र उपासे,केशवरावं वैद्य यांची निवड करण्यात आली.तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी सौ प्रगतीताई मंगरुडकर,उपाध्यक्ष पदी सौ वंदना ताई तडस आणि अर्चना कुबडे यांची निवड करण्यात आली.सचिव पदी सौ शारदाताई घाडगे तर कोषाध्यक्ष पदी सौ प्रियाताई आडकीने यांची तर सहकोषाध्यक्ष पदी सौ अंकिता ताई क्षीरसागर यांची तर सदस्य म्हणून सौ सुनीता ताई चाफले,सौ वैशाली ताई बुरडकर, सौ उषाताई सिडाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या प्रसंगी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांना सनद पत्राचे वाटप करण्यात आले. सेवानिवृत्त पोलीस पाटील श्री यज्ञपाल छोयले यांचा शाल श्रीफळ देऊन जिल्हाध्यक्ष आणि सचिव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सभेला समुद्रपूर स्टेशन अंतर्गत येणारे पाटील हजर होते तर या कार्यकारिणी निवड प्रसंगी हिंगणघाट स्टेशन, गिरड स्टेशन, वडनेर स्टेशन आणि सिंदी स्टेशन चे पदाधिकारी हजर होते.सभेची सांगता जेवणाचा आस्वाद घेऊन करण्यात आली. यश राऊत समुद्रपुर

Previous Post Next Post