*लोकतांत्रिक जनाधार पार्टी मनपा निवडणुकीत 40 उमेदवार उभे करणार*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)अकोला-महानगराच्या सर्वांगीण व स्वच्छ विकासासाठी नव्या दमाची लोक तांत्रिक जनाधार पार्टी आगामी मनपा निवडणुकीत विविध प्रभागात आपले 40 उमेदवार उभे करून महानगराचा साचेबद्ध विकास करणार असल्याची माहिती लोकतांत्रिक जनाधार पार्टीच्या वतीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.राष्ट्रात कार्यक्षम व तडफदार कार्यकर्ते निर्माण करून राष्ट्राचा व त्यातील सर्व जाती जमातीच्या नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त लोकतांत्रिक जनाधार पार्टी लोकसेवा करीत आहे. या अनुषंगाने महानगरात प्रथमच मनपा निवडणुकीत पार्टी निवडणूक लढवीत आहे.प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण, स्वच्छ विकास व पारदर्शी प्रशासन हे या पार्टीचे ब्रीद असून यासाठी समर्पित व विकासाचे भोक्ते असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच कोणत्याही पक्षांची युती न करता पक्ष आपली उमेदवारी बहाल करून प्रलंबित विकासाला चालना देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पार्टीकडे समर्पित कार्यकर्त्यांची फौज असून अनेक प्रभागातून कार्यक्षम उमेदवार पार्टीकडे उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेत पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दिनेश श्रीवास, प्रदेश सचिव शाम त्रिपाठी, विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत अग्रवाल,विधि अध्यक्ष एड अभिषेक गौतम, महानगर अध्यक्ष जय तिवारी, शहर अध्यक्ष संजय रील, उत्तरमंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत दुबे, प्रसिद्धी प्रमुख मोहन शुक्ला, प्रमुख कार्यकर्ते एड अभय गौतम,संदीप उपाध्याय, प्रकाश गावंडे समवेत बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकतांत्रिक जनाधार पार्टी मनपा निवडणुकीत 40 उमेदवार उभे करणार*.                                                                 
Previous Post Next Post