**आमदार राजेश विटेकर यांच्या प्रयत्नामुळे जिल्हातील शेतकरी सुखावला**. (मानवत } अनिल चव्हाण. )**——————————————*पाथरी विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेश भैय्या विटेकर यांच्या मागणीला मुख्यमंत्री यांनी मंजूरी दिल्याने अखेर सी.सी.आय.शेतकर्यांचा प्रतिहेक्टर २३.६८ क्विंटल कापूस खरेदी करणार. आयुक्तांकडून मर्यादा जाहीरपरभणी : जिल्ह्यात हेक्टरी १५ क्विंटलच कापूस खरेदीची मर्यादा सी.सी.आय.ने घातल्या मुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता. परिणामी, उर्वरित कापसाचे करायचे काय? हा प्रश्न शेतकर्यांना भेडसावत होता. याबाबत पाथरी विधान सभेचे युवा आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिल्या नंतर राज्यात २३.६८ क्विंटल कापूस खरेदीची नवी मर्यादा कृषी आयुक्तांनी जाहीर केली.सी.सी.आय.कडून हमी भावाने कापसाची खरेदी केली जात आहे. बाजारपेठेत मिळणारा कमी भाव लक्षात घेता शेतकऱ्यांचा सी. सी. आय. कडे कल दिसत आहे. मात्र सी. सी. आय. ने हेक्टरी १५ क्विंटलची मर्यादा घातल्याने विविध तंत्रज्ञानाचा वापर करून यापेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बाबया आदेशात म्हटले की, राज्य स्तरावरून निश्चित केलेली मर्यादा ही महसूल मंडळामध्ये घेतलेल्या एकूण १२ पीक कापणी प्रयोगावर आधारित असते. यामध्ये सर्वच उत्तम किंवा सर्वच निकृष्ट प्लॉट नसतात. मात्र वस्तुस्थितीचा विचार करता चांगले उत्पादन घेणाऱ्यांसाठी सुधारित उत्पादकता निश्चित करणे गरजेचे होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. अडचणीची ठरत होती. याबाबत पाथरी विधान सभेचे आमदार राजेश विटेकर यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यानंतर कृषी आयुक्तांकडून कापूस खरेदी मर्यादेबाबत सुधारित परिपत्रक काढले. यानुसार खरीप २०२५ मध्ये उत्पादित कापूस खरेदीसाठी २३.६८ क्विंटलची उच्चतम मर्यादा ठेवण्यात आल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0