हिंगणघाटमध्ये एलसीबीची धडक कारवाई; ५१४ ग्रॅम गांजासह दुचाकी जप्त, एक आरोपी अटकेत. वर्धा जिल्ह्यात अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक माननीय श्री. अनुराग जैन यांनी दिले असून, त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली.दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट येथील संतोषी माता मंदिराजवळ एन.डी.पी.एस. कायद्याच्या तरतुदींचे पालन करून छापा टाकण्यात आला.यावेळी निशांत संजय रीठेकर (रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट) व त्याचा एक अल्पवयीन साथीदार हे संशयास्पद अवस्थेत आढळून आले. पंचासमक्ष कायदेशीर झडती घेतली असता, त्यांच्याकडून ५१४ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला.चौकशीत आरोपींनी सदर गांजा नागपूर येथील कमाल चौक परिसरात राहणाऱ्या विनायक नावाच्या इसमाकडून विक्रीसाठी खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी आरोपी व विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून गांजा, पल्सर २२० मोटारसायकल (क्र. एम.एच. ४० बी.झेड. ८६१६) व मोबाईल असा एकूण १ लाख ७५ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हिंगणघाटमध्ये एलसीबीची धडक कारवाई; ५१४ ग्रॅम गांजासह दुचाकी जप्त, एक आरोपी अटकेत.                             
Previous Post Next Post