*मनमाडमध्ये नायलॉन मांजाचा कहर; महिला डॉक्टर गंभीर जखमी, कठोर कारवाईची शिवसेनेची मागणी...*. (मनमाड | प्रतिनिधी)मनमाड शहरात नायलॉन मांजाच्या वापरामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, याचा ताजा प्रकार १७ डिसेंबर २०२५ रोजी समोर आला आहे. शहरातील नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विद्या योगेश मगर या दुचाकीवरून आपल्या क्लिनिककडे जात असताना ईदगाह परिसरातील पुलावर नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाल्या.डॉ. मगर यांच्या चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेला असतानाही नायलॉन मांजामुळे खोल जखमा झाल्या असून, त्यांच्या चेहऱ्यावर अनेक टाके पडले आहेत. डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर नाशिक येथे पुढील उपचार सुरू आहेत. या घटनेत त्यांचा जीव थोडक्यात बचावला.ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, यापूर्वीही मनमाड शहरात नायलॉन मांजामुळे नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असतानाही शहरात त्याची खुलेआम विक्री व वापर होत असल्याचे दिसून येत आहे, ही बाब चिंताजनक आहे.या पार्श्वभूमीवर आमदार सुहास(आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष योगेश(बबलू) पाटील, उपजिल्हा प्रमुख सुनिल हांडगे यांनी मनमाड पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व वापर करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, पतंग विक्री करणाऱ्या दुकानदारांची तपासणी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, शहरात जनजागृती मोहीम राबवावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.या प्रसंगी महिंद्र शिरसाठ, वाल्मीक आंधळे, रामनाथ सानप, मुकुंद झाल्टे, लोकेश साबळे, सुभाष माळवतकर, संजय दराडे, मजित शेख, आसिफ पठाण, दशरथ जाधव,भीमराज लोखंडे, अनिल दराडे, आणू पठाण, निलेश व्यवहारे उपस्थित होते.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मनमाडमध्ये नायलॉन मांजाचा कहर; महिला डॉक्टर गंभीर जखमी, कठोर कारवाईची शिवसेनेची मागणी..
Previous Post Next Post