*रेल्वे पोलीसांची NDPS कायदया अंतर्गत कारवाई, पुरुष व महीला आरोपी अटकेत, आरोपींकडून ०२,४०,००० रूपये किंमतीचा १६ किलो ४१७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)आज दिनांक दि. १९/१२/२०२५ रोजी अकोला रेल्वे पोलीसांना आमच्या गुप्त बातमीदारांमार्फत गांधीधाम स्पेशल एक्सप्रेस ट्रेन नंबर २०८०३ या ट्रेनच्या ए/१ कोचमध्ये एक महीला व पुरुष हे गांजाची वाहतूक करत असल्याबाबत मिळालेल्या माहीतीवरून प्रभारी अधिकारी सपोनि अर्चना गाढवे यांनी सहा पोउपनिरी/सतिशसिंग चव्हाण, दामोदर सोळंके, म.पो.हवा. / सुनंदा राऊत, पो.शि./१३ विजय शेगावकर, पो.शि./११२४ कपिल गवई, पो.शि./१३७ संदीप पत्रे, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे उप निरीक्षक प्रविण मालवीय यांच्यासह अकोला रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्र. १ वर गेलो. सदर ट्रेन १२.०० वाजता प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर सर्व स्टाफसह ट्रेनच्या ए/१ कोचची तपासणी करता बर्थ क. १ वर असलेला संशयित एक पुरुष याच्या ताब्यात एक मोरपंखी रंगाची सॅकबॅग व बर्थ क. २ वर बसलेली महीला हीच्या बर्थवर तिच्या ताब्यात २ बॅग मिळून आल्या. त्या संशयित प्रवाशांकडे विचारपूस करता संशयित प्रवाशांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने त्या संशयित प्रवाशांना त्यांची बॅग व सामानाबाबत विचारपूस केली असता संशयितांनी बॅग मध्ये गांजा असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातील सदर बॅग तपासल्या असता त्यात खाकी रंगाचे सेलोटेपने चिटकवलेले एकूण ०८ बंडल दिसून आले. त्यातून गांजा या अंमली पदार्थाचा उग्र गंध येत असल्याने सदर पुरुष व महीला यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव १) सत्यम प्रफुल पात्रा, वय २६ वर्षे, रा. बी नोआपल्ली, कोडाला, जि. गंजम, राज्य ओरीसा, २) पुजा चितरंजन जेना, वय २३ वर्षे, रा.हनुमान मंदीराजवळ नौगाडा, पो. अंगराग्राम, कोडाला, जि. गंजम, राज्य ओरीसा असे असल्याचे सांगितले. रेल्वे पोलीसांनी एन.डी.पी.एस. कायदया अंतर्गत कारवाई करत आरोपीकडून खाकी रंगाचे सेलोटेपने चिटकवलेले एकुण ०८ बंडल, त्यामध्ये १६ किलो ४१७ ग्रॅम गांजा असा एकूण किंमत ०२,४०,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपींनी अंमली पदार्थ स्वतःजवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द लोहमार्ग पोलीस स्टेशन, अकोला येथे दाखल गुन्हा करण्यात आला असून सदर गांजा कोठून आणला? कोठे घेवून जाणार होता? याबाबत रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री मंगेश शिंदे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग अकोला, श्री पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला प्रभारी अधिकारी, सहा. पोलीस निरीक्षक, अर्चना गाढवे, सहा पोउपनिरी/सतिशसिंग चव्हाण, दामोदर सोळंके, म.पो.हवा. / सुनंदा राऊत, पो. शि. विजय शेगावकर, कपिल गवई, तुषार गोंगे, विजय जगणित, संदीप पत्रे, सुदामा सोळंखी, कुणाल साखरे, स्वाती थोरात, उज्वला गवई, रेल्वे सुरक्षा बलाचे उप निरीक्षक प्रविण मालविय यांनी केलेली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0