**UDID* कार्ड दाखल करूनच शासकीय लाभ मिळणार !अन्यथा दिव्यांगाचे शासकीय लाभ होणार बंद. (मानवत / प्रतिनिधी).—————————————मानवत तालूक्यातील दिव्यांगांसाठी 'UDID' कार्ड सक्तीचे; अन्यथा शासकीय लाभ होणार बंद तहसील प्रशासनाचा कडक इशारा; लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्रे जमा करावीअसे आवाहन तहसिल प्रशासनाकडून करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की,मानवत तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ चालू ठेवण्यासाठी आता 'UDID' (युनिक डिसॅबिलिटी आयडी) कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार ही अट लागू करण्यात आली असून, याबाबत मानवत तहसील कार्यालयाने कडक सूचना निर्गमित केल्या आहेत. कोणत्या योजनांना फटका बसणार ? शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आता UDID कार्ड सादर करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच या सोबत लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आणि योजनेला आधार क्रमांक संलग्न (Link) असणे ही आवश्यक आहे.त्यामुळे अनुदान बंद होण्याचा धोका शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांतील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा मासिक अर्थसहाय्य दिले जाते. मात्र, अनेक लाभार्थ्यांनी अद्याप UDID कार्ड, अद्ययावत दिव्यांग प्रमाणपत्र व आधार कार्ड सादर केलेले नाही. अशा लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे मासिक अनुदान (लाभ) बंद करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.मानवत तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड, मूळ दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड या कागदपत्रांसह मानवत तहसील कार्यालय येथील संबंधित विभागात तात्काळ संपर्क साधावा. वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास मिळणारा लाभ थांबविण्यात येईल, याची सर्व लाभाथ्यर्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय मानवत यांच्या वतीने आवाहन करण्यात आले.**
byमीडीया पोलीस टाईम
-
0