मौजे बडुर येथील अण्णा भाऊ साठे पुतळ्याच्या, नियोजीत जागेवरील अनाधिकृत बांधकाम थांबवा.चुकीचा पद्धतीने फेर लावणाऱ्या ग्रामसेवकास,निलंबन करण्याची समाज बांधवाची निवेदाद्वारे मागणी. (मारोती एडकेवारजिल्हा/ प्रतिनिधी नांदेड) नांदेड :बिलोली तालुक्यातील मौजे बडुर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या नियोजीत जागेवर गावातील एकाने अतिक्रमण करून जागा कब्जा करून वापर करून. सदर जागेवर अनाधिकृत बांधकाम करीत आसल्याचे निवेदनात नमूद करून सदर बांधकाम थांबवून अतिक्रमण काढण्या संदर्भात २९ डिसेंबर रोजी बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात निवेदनकर्ते असे नमूद केले की, बडुर येथील केवळबाई गंगाराम दावलेकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या नियोजीत जागेवर मागील काही वर्षापासुन अतिक्रमण करून जागा कब्जा करून वापर करून आज रोजी सदरील जागेवर अनाधिकृत बांधकाम करीत आहे. सदरील व्यक्तीच्या कुटूंबात यापुर्वीघर क्र ७१८ या जागेवर नामे गंगाराम कोंडिबा दावलेकर (मदवा) या नावाने घरकुलाचा लाभ घेऊन वास्तव्यास रहात होते. तसेच सदर व्यक्तीच्या नावाने पुर्वीचे ४४२ या घर क्रमांकाचे मालक होते. घर क्र ७१८ व ४४२ या दोन्ही क्रमांकाचेमहाराष्ट्र शासन गट विकास अधिकारी बिलोली ग्रामसेवकानी खरेदी घर विक्रीचा फेरफार बॉन्डवर अनाधिकृत पणे व चुकीचे फेरफार केले असल्याने संबधित ग्रामसेवक यांना निलंबीत करण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आले आहे. निलंबन नाही केल्यास अमोरण उपोषण करण्याचा इशारा ही दिला आहे.सदर निवेदनावर मारोती जाधव रमेश सोमवार, विठ्ठल दावलेकर, पिराजी दावलेकर,राम भंडारे,योगाजी दावलेकर,सोमवारे रमेश,सोमवारे श्रीकांत,दावलेकर अनिल, गंगाराम भंडारे, गोविंद दावलेकर,सोमवारे शंकर,मच्छीद्रनाथ दावलेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.या गंभीर बाबींची नोंद घ्यावी अशी बडुर येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0