नेरी कडून जळगाव कडे जाणाऱ्या मोटरसायकलचा अपघात, (जामनेर/ प्रतिनिधी )नेरी कडून जळगाव कडे जाणाऱ्या एम एच 19 बी एफ 79 90 नंबरच्या मोटरसायकलचा चिंचोली जवळच्या पुलावरून खाली कोसळून अपघात झाला, त्या पुलाची खोली वीस फूट असेल व खाली कोसळली त्या जागी दगडे होती, व मोटर सायकल डबल सीट असल्याकारणाने फुल वेगामध्ये गाडी पुलावरून वीस फूट खोल नाल्यामध्ये कोसळली ,या मोटरसायकल वरती एक पुरुष व महिला असल्याचे स्थानिक नागरिकांनी माहिती दिली, ज्यावेळेस घटना स्थळाचे दृश्य बघितले तर तेथील दृश्य भयानक होते, मोटर सायकल वीस फूट खोल नाल्यात पडलेली गाडीचे हेड लाईट फुटलेले शोकप बेंड झालेले कपड्यांच्या पिशव्या फाटून कपडे व साड्या ,रक्ताने भरलेला लेडीज रुमाल ,व गाडीच्या बाजूला पसरलेले रक्त, हे दृश्य बघून सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांचे हृदय पिढवून टाकणार हे दृश्य होतं, सर्व लोक कुतूहलाने एकमेकांना विचारणा करीत होते की हे गाडीवरील स्त्री पुरुष वाचले असतील का, काही लोक म्हणत होते की गाडी चालक दारू तर पिलेला नसेल, स्पॉट अपघात होण्यासारखा नाही ,तरी गाडी पुलाच्या खाली कशी पडली कारण काहीही असो मात्र अपघात ग्रस्त व्यक्ती जिवंत असावेत असे सर्वांना वाटत होते, घटनास्थळ व गाडीच्या आजूबाजूला पडलेला वस्तू बघता असे वाटत होते की ,अपघात ग्रस्त व्यक्ती गरीब घरचा असेल, असे घटनास्थळावरून वाटत होते, अपघाताचे कारण काहीही असो, मात्र गरिबीची परिस्थिती आणि दवाखान्याचा खर्च व दवाखान्याचा खर्चही करून आलेले अपंगत्व त्यातच घरातील एकमेव कमावणारे व्यक्ती, अपघाताने सर्वसाधारण माणसाच्या पूर्ण कुटुंब उध्वस्त होतो ,ते लहान मुले ,म्हातारे आई-वडील, आणि गरिबीची परिस्थिती या अपघातामुळे अपघात झालेल्या व्यक्तीचा पूर्ण संसार उध्वस्त होतो, त्यामुळे सर्व वाहन चालकांनी व्यवस्थित वाहन चालवायला हवे, कारण आपल्या एका चुकीमुळे समोरच्या वाहन चालकाचा मृत्यू होऊ शकतो, किंवा त्याला कायमचे अपंगत्व येऊ शकते, त्यामुळे सर्व वाहनधारकाने जबाबदारीने वाहन चालवावीत जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्ती वरती दुःख येऊ नये पत्रकार अंबादास संतोष जाधव mo 97670 22719

नेरी  कडून जळगाव कडे जाणाऱ्या मोटरसायकलचा अपघात,                                                                                                  
Previous Post Next Post