नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या दिवसीच पंचसूत्री योजना सुरू करणार---- शंकर बोल्लमवाड पत्रकार परिषदेत दिली सविस्तर माहिती. (धर्माबाद(वार्ताहर ) नगरपालिका २०२५ च्या निवडणुकीचा निकाल दिनांक २१ डिसेंबर २०२५रोजी लागला. या निवडणुकीत नवीन स्थापन झालेल्या मराठवाडा जनहित पार्टीने नगराध्यक्ष व १५ नगरसेवक यांना प्रचंड मताने निवडूण आल्यानंतर मजपा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शंकर बोल्लमवाड यांनी दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याच्या आधीच नगर विकासासाठी हाती घेतलेल्या योजनेची माहिती दिली आहे. या परिषदेत मजप पार्टीचे मार्गदर्शक मोईजोद्दिनसेठ बिडीवाले करखेलीकर, व सचिव ताहेर पठाण यांची उपस्थिती होती.मजप पार्टीचे संस्थापक महेश उर्फ शंकर बोल्लमवाड यांनी पत्नी संगीता बोल्लमवाड यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देऊन सर्व अधिक५७१६ आणि विजय करून नऊ पैकी सात नगराध्यक्ष पदाचे महिला उमेदवारांची डिपॉझिट जप्त करून विजय झाले आहेत.२२ नगरसेवकापैकी स्वतः सह १५ नगरसेवक प्रचंड मतांनी विजयी करून बहुमत सिद्ध केले आहे.हा धर्माबाद च्या इतिहासातील ऐतिहासिक विजय समजला जातो. धर्माबाद नगरपालिकेवर पहिलाच मजपाचा झेंडा नवीन पार्टीने रोवला आहे.नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणे आधीच दि.३० डिसेंबर २०२५ रोजी येथील गोदावरी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद बोलावून नगरपालिकेचा विकास कसा करणार? यासाठी दिलखुलास माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेस पक्षाचे मार्गदर्शक मोईजोद्दीन सेठ बिडीवाले करखेरीकर उपस्थित होते.मजप पार्टीचे संस्थापक अध्यक्ष महेश उर्फ शंकर बोल्लमवाड यांनी विजयानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराचे शब्द सुमनाने स्वागत व अभिनंदन केले आहे तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुढील प्रमाणे पत्रकार परिषदेत त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.मराठवाडा जनहित पार्टी ही भाजप ची बी टीम नसून हा स्वतंत्र पक्ष आहे. धर्माबाद शहराचा विकास हा आमचा एकच ध्यास एवढ्यासाठीच पक्षाची स्थापना केलेली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी आमच्या पक्षाला सहयोगी पक्ष म्हटलेले आहे पण भाजपची बी टीम नाही पहिले स्पष्ट केले आहे.नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलेल्या दिवशीच आम्ही पंचसूत्री योजना सुरू करणार असे यांनी जाहीर केले आहे.नगर उपाध्यक्ष पद हे मजप पार्टीचाच राहील. एक स्वीकृत सदस्य मजपाचा व एक भाजपाचा स्वीकृत सदस्य राहील.मजप नी दिलेला नगर विकासाचा जाहीरनामा तंतोतंत अमलात आणणार असून त्यात तडजोड होणार नाही तसेच धर्माबाद करांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे अभिवचन दिले आहे.कुणावरही टीकास्त्र न करता विकास कामाचे नियोजन करून राहिलेल्या समस्या पूर्ण करणार , सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.नवीन योजनेपैकी ,टोल फ्री नंबर दिला जाईल, एक खिडकी योजना सुरू केली जाईल, इनामी व अवकाफ, वन विभागाच्या जागेवर बांधलेल्या घरांना सेवाशुल्क पावती देणार, बेरोजगारासाठी एमआयडीसी या योजनेचा पाठपुरावा करणार, आठवडी बाजाराचा प्रश्न सोडवणार, रस्ते, नाली बांधकाम करून शहर स्वच्छता अभियान योजना जोमाने राबविणार, वीज पुरवठा नियमित करण्यासाठी योजना राबविणार, आवश्यक असलेल्या नगरात बालवाडी सुरू करणार, शासनाने दिलेल्या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार. गुंठेवारी पद्धतीचा नियमाने प्रकरण सोडविणार. आमचा पक्ष नवीन असून काही उनिवा वाटल्यास मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा केली आहे. . बैठकीनंतर सुरुची जेवणाची व्यवस्था केली होती.पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार पार्टीचे सचिव ताहेर पठाण यांनी केले आहे. पत्रकारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.धर्माबाद च्या इतिहासात कोणत्याही नगराध्यक्षांनी पत्रकार परिषद बोलावलेली नव्हती. निवडणुकीपूर्वी तसेच निवडणुकीनंतर पदभार स्वीकारणे आधी अशा दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती देणारे पक्षाचे अध्यक्ष महेश उर्फ शंकर बोल्लमवाड हे एकमेव ठरले आहेत.
byमीडीया पोलीस टाईम
-
0