मंगरूळपीर शहरात ट्रॅक्टर व दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ – मंगरूळपीर पोलीस स्टेशनच्या निष्क्रिय भूमिकेबाबत तक्रार व तातडीच्या कारवाईची मागणी. मंगरूळपीर शहरातील जागरूक नागरिक म्हणून आपले लक्ष अत्यंत गंभीर बाबीकडे वेधू इच्छितो. मागील काही महिन्यांपासून मंगरूळपीर शहर व परिसरात ट्रॅक्टर व दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. या चोरीच्या घटनांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी व कामगार वर्ग प्रचंड भयभीत व त्रस्त झाला आहे.अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे, या वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांबाबत मंगरूळपीर पोलीस स्टेशन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक नागरिकांनी तक्रारी दिल्यानंतरही तपासात अपेक्षित गती नसून, चोरट्यांवर कोणताही ठोस आळा बसलेला नाही. परिणामी, चोरट्यांचे मनोबल वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.ट्रॅक्टरसारखी महागडी शेती अवजारे चोरीस जाणे हे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर थेट आघात असून दुचाकी चोरीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. ही परिस्थिती प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे.तरी आपणांस नम्र विनंती आहे की,1. मंगरूळपीर शहरातील ट्रॅक्टर व दुचाकी चोरीच्या घटनांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.2. चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी.3. शहरात नियमित नाकाबंदी, रात्र गस्त व पेट्रोलिंग वाढवण्यात यावी.4. मंगरूळपीर पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात.आपल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळेच मंगरूळपीर शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.आपण योग्य ती कारवाई कराल, ही नम्र अपेक्षा.धन्यवाद.आपला विश्वासू,इरफान शेख(जागरूक नागरिक, मंगरूळपीर)
byमीडीया पोलीस टाईम
-
0