एनसीसी पंतप्रधान सायकल रॅली 2026 च्या पार्श्वभूमीवर एनसीसी संचालनालय महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित* * (सतीश परदेशी मनमाड ): एनसीसी पंतप्रधान सायकल रॅली 2026 च्या पार्श्वभूमीवर एनसीसी संचालनालय महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी पुणे ते दिल्ली अशी भव्य सायकल मोहीम ( शौर्य के कदम, क्रांती की ओर ) या नावाने राबविण्यात येणार आहे. या महिन्याचा प्रारंभ शनिवार वाडा, पुणे येथून करण्यात येणार असून ही मोहीम 26 जानेवारी 2026 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कर्तव्यपथावरील संचालनात सहभागी होणार आहे. या रॅलीचा तिसरा टप्पा संगमनेर ते मनमाड असे एकूण 104 किलोमीटरचा 20 सदस्य असलेल्या पथकाचे भव्य स्वागताचा कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयाच्या प्रांगणात 50 महाराष्ट्र एनसीसी बटालियन छ. संभाजी नगर, मनमाड महाविद्यालय व छत्रे हायस्कूल यांच्या सहभागातून करण्यात आले. या धाडसी सायकल मोहिमेत सहभागी कॅडेट्स सुमारे 1680 किलोमीटर चे अंतर पाच राज्यातून पार करणार असून मोहिमेदरम्यान विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहे. मोहिमेचे नेतृत्व अमरावती एनसीसी ग्रुप चे प्रमुख ब्रिगेडियर सचिन गवळी, 11 महाराष्ट्र बटालियन अकोला चे कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय शुक्ला यांच्यासह 12 कॅडेट्स सहभागी झाले आहेत. रॅलीचे स्वागत व सत्कार प्रभारी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल कीर्ती मुंडले, (50 महाराष्ट्र एनसीसी बटालियन छ. संभाजीनगर), प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील( मनमाड महाविद्यालय ), प्राचार्या सौ. संगीता पोतदार (छत्रे हायस्कूल ) यांनी केले. याप्रसंगी एनसीसी छात्रांनी विविध पारंपरिक नृत्य प्रकार,नाट्यप्रकार व पथनाट्य यांचे सुंदर सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. व रॅलीत सहभागी झालेल्या छात्रांना पुढील सायकल प्रवासासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन छ. संभाजीनगर एनसीसी ग्रुप यांच्या मार्गदर्शनाखाली 50 महाराष्ट्र बटालियचे प्रभारी कमांडिंग ऑफिसर कीर्ती मुंडले, सुभेदार शरद पवार, कॅप्टन प्रकाश रमेश बर्डे, मनोज पाटील यांनी केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0