*स्वच्छ महाराष्ट्र अभियान कचरा व्यवस्थापण अभियान संपन्न*. (मानवत / प्रतिनिधी.)———————स्वच्छ महाराष्ट्र अभियान अतर्गत निरोगी भारत एकच लक्ष्य शहर स्वच्छ या अभियानार्तगत आज मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या , नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात आज कचरा व्यवस्थापण समितीने पाहणी करून विद्यालयास प्रशस्तीपत्र देऊन गूण गौरव करण्यात आले.यावेळी नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत "कचरा व्यवस्थापन" विषयावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित जनजागृती कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून सदर उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 च्या कचरा मुक्त तसेच स्वच्छ शहरे या राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शाळेचे योगदान प्रशंसनीय असल्याने आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्पक्त केले.आज दिनांक २६/१२/२०२५ रोजी नवनाथ वाठ राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना.) यांच्या स्वक्षरीचे प्रशिस्ती पत्र देऊन विद्यालयात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियाना साठी कौतूक करून अभिनंदन केले. यावेळी शिक्षक व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान  कचरा व्यवस्थापण अभियान संपन्न*.                                                                                            
Previous Post Next Post