*बालिका दिनानिमित्त कन्या विद्यालयात कार्यक्रम*. (कैलास शेंडे विभागीय संपादक नंदुरबार ) `सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचे आवाहन`)तळोदा : गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय, तळोदा येथे कार्यक्रम बालिका दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना मुख्यध्यापक मिलिंद धोदरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची ज्योत आजच्या प्रत्येक मुलीच्या मनात तेवत ठेवण्याचे आवाहन करीत बालिकांचे शिक्षण, आत्मविश्वास व स्वाभिमान हे सक्षम समाजनिर्मितीचे बळ असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमात सृष्टी गाढे,विधी पाटील,मोहिनी पाटील,डिम्पल मराठे, प्रतीक्षा चव्हाण, कीर्ती हिरे, विद्या काविरे, मनीषा अहिरे, नेहा अहिरे, प्रतीक्षा अहिरे आदी विद्यार्थिनींनी ‘सावित्रीबाईंच्या लेकी’ म्हणून मनोगत व्यक्त केले. ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ या मनोगताने विशेष लक्ष वेधले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री सागर यांनी केले. आभार वैशाली देवरे यांनी मानले.यावेळी समतादूत कल्पना ठाकरे, योगेश पाटील, दिलीप तडवी, दिनेश मराठे, आकाश महाजन, ज्योती महाजन, उल्हास मगरे, अनिल मगरे, हिरालाल पाडवी, धनराज केदार, सुदाम माळी आदी उपस्थित होते.

बालिका दिनानिमित्त कन्या विद्यालयात कार्यक्रम*.                     
Previous Post Next Post