नवीन वर्षाचे आगळेवेगळे स्वागत... (कैलास शेंडे नंदुरबार विभागीय संपादक नंदुरबार ) दि.02/01/2026 रोजी रात्री तळोदा शहरातील शंकर नगर व काशीराम नगर येथील रहिवासी परिवारांनी एकत्र येत नवीन वर्षाचे आगळेवेगळ्या पद्धतीने स्वागत केले. नव्या पिढीला सकारात्मक दिशा व नवीन वाटचाल मिळावी या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सर्व वयोगटातील पुरुष व महिलांनी सहभाग घेतला. आजच्या पिढीपासून दूर गेलेले, मात्र जुन्या पिढीला परिचित असलेले पारंपरिक खेळ सादर करून त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये गोट्या खेळणे, कबड्डी, आंधळी कोशिंबीर, विटी दांडू , लगोरी, खो खो, कवड्या, टायर, दोरी उडी, मामाचे पत्र, रस्सीखेच, आट्यापाट्या व भोवरा यांसारख्या खेळांचा समावेश होता. या खेळांमुळे उपस्थितांना व नवीन पिढीला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख झाली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

नवीन वर्षाचे आगळेवेगळे स्वागत...                         
Previous Post Next Post