ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु. येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.. . (तालुका प्रतिनिधी :)यावल तालुक्यातील सांगवी बु. (जि. जळगाव) येथील ज्योती विद्या मंदिर या शाळेत शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. मनीषा ताडेकर यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर आधारित विद्यार्थिनींनी प्रभावी मनोगते व भाषणे सादर केली.जानवी आढाळे, रोहिणी तायडे, आराध्या तायडे, निकिता धनगर, तेजस्विनी तायडे, अस्मिता मेघे व श्रुती तायडे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सादर केलेली भाषणे विशेष लक्षवेधी ठरली. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सुंदर नाटिका सादर करून त्यांच्या विचारांचे प्रभावी दर्शन घडविले.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे, पर्यवेक्षक श्री. सी. पी. फिरके, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. व्ही. व्ही. धनके सर यांनी केले.कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्त्री शिक्षण, सामाजिक समता व परिवर्तनाची जाणीव निर्माण झाली
byमीडीया पोलीस टाईम
-
0