**क्रांतिज्योती* सावित्रीमाई फूले यांची जयंती *बालीका* दिन म्हणून विद्यालयात साजरी. (मानवत / प्रतिनिधी.)————————येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या, नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी "नारी शक्ती" म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. कुसुमताई कनकुटे मॅडम, तसेच प्रमुख पाहुण्या श्रीमती पतंगे मॅडम श्रीमती डोके मॅडम प्रमुख वक्त्या मार्गदर्शक म्हणून श्रीमती प्रभाताई कच्छवे मॅडमया होत्या. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करूण पूष्पहार अर्पण करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता दहावी (ड) मधील कु.आनंदी बोरबने या विद्यार्थिनींने सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्र्यावर विचार खूप छान अशी प्रस्तावने मधून व्यक्त केली. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण करण्यासाठी विद्यालयातील 36 मुली व बारा (१२) मुले यांनी आवर्जून सहभाग नोंदवीला होता. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून प्रभाताई कच्छवे मॅडम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील अनेक कार्यावर प्रकाश टाकला समाजातील रूढी, परंपरा त्या काळातील समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर मात करून स्त्री शिक्षणासाठी लढा दिला हे आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच अध्यक्ष समारोप मध्ये श्रीमती कुसुमताई कनकुटे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या बालपणातील धाडसा बद्दल कथेतून मार्गदर्शन केले. त्या काळातील समाजातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले असे मार्गदर्शन केले*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नववी ड या वर्गातील कु.भगवती काबरा व कु.अमृता जाधव या मुलींनी अतिशय उत्कृष्ट असे केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री बाभळे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपल्या गीताद्वारे केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषामध्ये कु नंदिनी लेंगुळे कु.संध्या बोरबने, कु.रोशनी गायकवाड कु.नंदिनी मसारे, कु.अश्विनी गायकवाड या 9 वी क आणि ब या वर्गातील मुलींनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला होता.प्रमुख उपस्थितीमध्ये क्रीडा शिक्षक श्री माणिकराव सिसोदे,श्री अशोक काळे सर श्री.अशोक बैस सर, श्री.गणेश शिरसकर सर,श्री. दवंडे सर श्री.बाळ नाईक सांस्कृतिक प्रमुख श्री केशव बाभळे सर,श्री.विनायक बंडे सर,श्री सारडा सर,श्री सुरज वाडकर सर, ठमके सर श्री.सोनटक्के सर,श्री राजू सूर्यवंशी सर,यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी श्री दिगंबर रोकडे यांनी मोलाचं सहकार्य केले या कार्यक्रमा मध्ये अतिशय उत्साहा मध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा सहभाग दिसून आला.****

क्रांतिज्योती* सावित्रीमाई फूले यांची जयंती *बालीका* दिन म्हणून विद्यालयात साजरी.                                                                           
Previous Post Next Post