रावेरमध्ये रामनवमी सभेनंतर वादाचा स्फोट – मुस्लिम पंच कमिटी आक्रमक!दोषींवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी.. (रावेर (प्रतिनिधी): रामनवमीच्या मिरवणुकीनंतर झालेल्या सभेमध्ये भडकावू भाषण झाल्याचा आरोप करत रावेर शहरातील मुस्लिम पंच कमिटी सदस्यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन सादर करत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.दि. 26 मार्च 2026 रोजी रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीनंतर श्रीदत्त मंदिर नाला भागात झालेल्या सभेत काही वक्त्यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामध्ये हर्ष ताई ठाकुर व महंत योगी दत्तनाथजी महाराज (शिंदखेडा) यांच्या भाषणाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, या सभेदरम्यान झालेली घोषणाबाजी आणि भडकावू वक्तव्यांचे व्हिडिओ "आपले रावेर" या सोशल मीडिया ग्रुपवर प्रसारित करण्यात आले असून त्यामुळे शहरातील शांततेचे वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रावेर शहरात हिंदू-मुस्लिम समाज एकतेने व शांततेने राहत असताना अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, अशी चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.मुस्लिम पंच कमिटीने संबंधित वक्ते, आयोजक, सूत्रसंचालक तसेच व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर शेख गयास , युसुफ खान , अ. रफिक , सै. आरीफ ,शेख सलीम ,शेख सादीक ,अ. मुतल्लीब ,जी एस काजी ,शेख महेमुदशेख निसार,मदस्सर अली , आसीफ मोहम्मद ,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.👉 रावेरमध्ये वाढता तणाव टाळण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रावेरमध्ये रामनवमी सभेनंतर वादाचा स्फोट – मुस्लिम पंच कमिटी आक्रमक!दोषींवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी..
Previous Post Next Post