भद्रावतीत दुर्गा माता मंदिर फोडी प्रकरण उघड; आरोपी अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त.. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.28:- भद्रावती शहरातील बाजार वार्ड परिसरातील दुर्गा माता मंदिर येथे मंदिर फोडून दानपेटीतील रक्कम चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत भद्रावती पोलीस ठाणे येथे अप क्र. 425/2026 अन्वये कलम 331(4), 305(अ) B.N.S. 2023 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी राजेश गोपीनाथ दास (वय 62, रा. गजानन नगर, रेल्वे स्टेशन रोड, भद्रावती) यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीनुसार, दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी मंदिर बंद करून पुजारी घरी गेले होते. त्यानंतर दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता मंदिर उघडण्यासाठी गेले असता मंदिराचे कुलूप व दानपेटीचा तळ तोडलेला आढळून आला. दानपेटीतील अंदाजे पाच ते सात हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले.सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी संशयित शुभम विठ्ठल झाडे (वय 31, रा. झाडे प्लॉट, भद्रावती) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली 4,100 रुपये रोख रक्कम तसेच दानपेटी फोडण्यासाठी वापरलेली एक लोखंडी सब्बल (किंमत अंदाजे 250 रुपये) असा एकूण सुमारे 4,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुमुक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल तसेच पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील जीपीएसआय गजानन तुपकर, पोहावा जगदीश झाडे, विश्वनाथ चौधरी, पो.अं. योगेश घाटोळे, संतोष राठोड व खुशाल कावडे यांनी केली. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

भद्रावतीत दुर्गा माता मंदिर फोडी प्रकरण उघड; आरोपी अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त..                                                             
Previous Post Next Post