कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा भावनिक सत्कार सोहळा........................................ वर्धा पोलीस दलात प्रदीर्घ व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा वर्धा पोलीस यांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. अनेक वर्षे जनसेवेसाठी कार्यरत राहिलेल्या अधिकाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कारया कार्यक्रमात वर्धा जिला पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच वर्धा जिला अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती विशेष भावनिक ठरली.सेवानिवृत्त झालेले अधिकारीश्री. नारायण आर. कुंभलवार – ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, वर्धा – ३७ वर्षांची उल्लेखनीय सेवाश्री. धर्मपाल शंकरराव मानकर – श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन पुलगाव – ३५ वर्षांची निष्ठावंत सेवापोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनयावेळी बोलताना वर्धा जिला पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले की,“पोलीस सेवा ही अत्यंत आव्हानात्मक असते. कुटुंब आणि कर्तव्य यांचा समतोल राखत तुम्ही दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. पोलीस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनसेवेचा वारसा तुम्ही समर्थपणे जपला आहे.”तसेच त्यांनी सर्व निवृत्त अधिकाऱ्यांना निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.मोठ्या संख्येने उपस्थितीजिल्हा गुन्हे आढावा बैठकीनिमित्त सर्व वरिष्ठ अधिकारी मुख्यालयात उपस्थित होते. या सोहळ्यास पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. पुंडलिक भटकर, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सेवेचा प्रवास संपला असला तरी समाजासाठी दिलेला आदर्श कायम प्रेरणादायी राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.।।मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा भावनिक सत्कार सोहळा........................................                                           
Previous Post Next Post