*ॲड. रूपाली राऊत पातूर विधीज्ञ संघाच्या महिला उपाध्यक्षपदी बिनविरोध* {पातुर अकोला प्रतिनिधी दुल्हे खान) माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांचे निवडणुकीच्या नियमाने प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी होत असलेल्या निवडणुकांमध्ये महिला वकिलांना 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. उपरोक्त आदेशाच्या पालनाकरिता पातुरविधीज्ञ संघामध्ये महिला प्रतिनिधी नेमण्याकरिता पुन्हा निवडणूक प्रक्रिया पार पाडून पातुर विधीज्ञ संघाने अँड.रूपाली दामोदर राऊत यांना महिला उपाध्यक्षपदी अविरोध निवडून दिले.याप्रसंगीअँड.रूपाली राऊत यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय,बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच पातुर विधीज्ञ संघातील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.पातुर विधीज्ञ संघामध्ये यापूर्वी त्यांनी पातुर विधीज्ञ संघाच्याअध्यक्ष पदाची सुद्धा जबाबदारी सांभाळलेली आहे. पातुर विधीज्ञ संघामध्ये प्रथमच महिला उपाध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्या पदावर पहिल्यांदा अँड. रूपाली राऊत यांची निवड झाली आहे त्याबद्दल पातुर विधीज्ञ संघाच्या सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0