रावेर तालुक्यातील अजंदे गावात मुलांकडून आईचा शोध रावेर तालुक्यातील अजंदा येथील महिलेचा बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल.. (जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे)अजंदा (ता. रावेर) येथील शोभा रामा बिरपण (वय ४५) या दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घरातून निघून गेल्यापासून बेपत्ता आहेत. संबंधित महिला काही प्रमाणात मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.कुटुंबीयांनी गाव परिसरासह नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. अखेर हरविल्याची तक्रार रावेर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पी. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राहुल शोभा बिरपण – ९६६५८ ४१२०० उमेश बिरपण – ९३२५३०३७४०कोणालाही शोभा रामा बिरपण दिसल्यास किंवा माहिती असल्यास वरील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

रावेर तालुक्यातील अजंदे गावात मुलांकडून आईचा शोध रावेर तालुक्यातील अजंदा येथील महिलेचा बेपत्ता;    पोलिसांत तक्रार दाखल..                                                                                      
Previous Post Next Post