यावल तालुका हादरला हिंगोन्यात भर दिवसा चाकू हल्ला.22 वर्षीय तरुणाचा मृत्यू तिघे जखमी.. (जळगाव जिल्हा खानदेश उपसंपादक प्रवीण मेघे ) याावल तालुक्यातील हिंगोना येथे आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ घडलेल्या रक्तरंजित चाकू हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे नागरिकांची वर्दळ सुरू असतानाच घडलेल्या या घटनेत प्रथमेश मुकेश महाले वय अंदाजे 22 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत किरकोळ वादाचे भीषण रूप प्राथमिक माहितीनुसार एखाद्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे एका अल्पवयीन आरोपीने प्रथमेश महाले यांच्यावर धारदार चाकूने अचानक हल्ला केला आरोपीने त्याच्या छातीवर व पोटावर सपासप वार केल्याने ते जागेच कोसळले घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला रुग्णालयात नेत असताना मृत्यू उपस्थित नागरिकांनी तात्काळ प्रथमेश यांना उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला मात्र छाती व पोटावर खोल जखमा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्तवा झाला होता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन पाटील यांनी तपासणी करून प्रथमेश महाले यांना मृत्यू घोषित केले मध्य स्ती करणारेही जखमी दरम्यान वाद सोडवण्यासाठी पुढे सरसावलेल्या रीना रोहित गजरे मोहित राजेंद्र गजरे व निखिल राजेंद्र गजरे यांनाही आरोपीने चाकूने जखमी केले त्यांच्या हातावर व शरीराच्या इतर भागावर वार झाल्याची माहिती आहे तिघांवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याचे प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे पोलिसांची धाव तणावाचे वातावरण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून दिवसा ढवळ्या आरोग्य केंद्रासमोर अशी घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे या प्रकरणी गुन्ह्याची नोंद फैजपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीसाची पथके कार्यरत आहेत अल्पवयीन आरोपी असल्याने पुढील कायदेशीर कारवाई किशोर न्याय कायद्यानुसार होण्याची शक्यता आहे स्पष्ट कारण काय पूर्वीसह काही वाद किंवा होते याबाबत पोलिसांकडून संकुल तपास सुरू आहे अधिक तपास पूर्ण झाल्यानंतर घटनेचे संपूर्ण कारण स्पष्ट होणार आहेyavalhews नेमके कारण अद्याप अस्पष्ट हल्ल्यामागील नेमके कारण कार्य पूर्वीपासून काही वाद किंवा वैमानस्य होते का याबाबत पोलिसांकडून संखोल तपास सुरू आहे अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे संपूर्ण स्पष्ट होणार आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0